मोदींवर टीका करणारे ना. जयंत पाटील यांचे ट्विट केले share
राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे हे ट्विट नाथभाऊंनी रिट्विट केले आहे.
टीम : ईगल आय मीडिया
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे ट्विट रिट्विट केल्यामुळे नाथाभाऊंचे भाजप सोडणे निश्चित झाल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना रिट्विट करीत नाथाभाऊ राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचा असाही सूचक ईशारा त्यांनी भाजपमधून जातात केला आहे.
नाथाभाऊ भाजपच्या राज्यातील नेत्यांवर सातत्याने टीका करीत आहेत, त्यातच आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी च्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या टीकेला सूचक समर्थन देत भाजपला सोडचिट्ठी देण्याचे संकेत देतानाच कुठल्या पक्षात जाणार आहेत त्याचाही सूचक ईशारा केला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश आता औपचारिक उरला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी च्या नेत्यांनी अगोदरच आणि मंगळवारी शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वेगवान हालचाली होतआहेत. एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे सूचक संकेत दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली आहे.
तासाभरात ट्विट डिलीट ! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट करत आपल्या प्रवेशाचे सूचक संकेत देणाऱ्या एकनाथ खडसे यांनी तासाभरातच माघार घेतल्याने आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारं ट्विट रिट्विट केल्यानंतर ते डिलीट केलं आहे.
नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासियांना संबोधून भाषण केलं. त्यांच्या या भाषणावर टीका करणारं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला”.