सोलापुरात महायुतीला धक्का बसणार ? आ.प्रणिती शिंदे यांनी घेतली राजू खरे यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक राजू खरे : पंढरपूर ,मोहोळ आणि उत्तर सोलापूर भागात मोठी ताकद

पंढरपूर : eagle eye news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि मोहोळ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी गेले वर्षभर तयारी करीत असलेले पंढरपूरचे उद्योजक राजू खरे यांची सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांनी रविवारी भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून कसलाही संपर्क साधलेला नाही अशी तक्रार यावेळी खरे समर्थकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आ. प्रणिती शिंदे आणि राजू खरे यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालेले आहे.


आ. प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर ग्रामीण भागात गावभेट दौरा सुरू आहे. अशातच त्यांनी राजू खरे गोपाळपूर येथे असल्याची माहिती मिळताच शिंदे यांनी खरे यांच्या फार्म हाऊसवर जाऊन आपल्याला या निवडणुकीत मदत करण्याची विनंती केली आहे. राजू खरे हे कडवट शिवसैनिक आहेत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते समर्थक म्हणून ओळखले जातात.

यावेळी खरे यांनी आ. शिंदे यांचे जंगी स्वागत केले तर सौ. तृप्तीताई खरे यांनी आ. शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जयवंत माने, सुधीर अभंगराव, काँग्रसचे बजरंग बागल, यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, तसेच खरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!