‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’

नाथाभाऊंच्या पुस्तकाचे असेल नाव

टीम : ईगल आय मीडिया

मी पुस्तक लिहिण्याएवढा मोठा नाही, मात्र त्यांच्या प्रेमाने लिहिलं आहे. तुमच्या मनात असलेले हे पुस्तक नाही ते अजून यायचे आहे. त्यामुळेच मी ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहिणार आहे, अशी घोषणा माजी महसूलमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे आँनलाईन झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थितीत होते.याच कार्यक्रमात खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला.

यासंदर्भात पुढे बोलताना नाथाभाऊ म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते, आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना सन्मानाची वागणूक कशी दिली जाते, याचे सगळे पुरावे मला मिळाले आहेत असा दावा करून नाथा भाऊ पुढे म्हणाले की, सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले, मग विधानसभेला तिकीट का दिले नाही? मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचे दु:ख नाही. उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो. मात्र पक्षा विरोधात कधीही बोलणार नाही. नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. स्वस्थ बसणार नेता नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे, अशा शब्दात खडसे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!