तुतारी चिन्ह विठ्ठल चरणी अर्पण

पंढरपूर : eagle eye news
२०१४ नंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून राज्यातील एकता, समानता या महाराष्ट्रातून नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जातीवाद, धर्मवाद मोठ्या प्रमाणात वाढवला, सामान्य लोकांचे महत्वपूर्ण असणारे विषय बाजूला ठेवले, शेतकरी, गोर- गरीब यांचे प्रश्न न सोडवता कुटुंब, राजकीय पक्ष फडणवीस यांनी फोडले, सागर बंगला हा नेत्यांना वाचवण्यासाठी, सागर बंगला हा आमदारांना वाचवण्यासाठी, सागर बंगला कुटुंब फोडण्यासाठी आहे, सागर बंगला सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही प्रयत्न करीत नाही असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. रोहित पवार यांनी केला.
भाजपचे प्रामाणिक नेते नाराज असून पक्षातून बाहेर पडतील !
अनेक नेत्यांनी भाजपचे प्रामाणिकपणे त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती,परंतु त्यांना मिळाले नाही, तर ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले, त्यांनाच भाजपने पक्षात घेऊन पदे दिली, म्हणून महाराष्ट्रात भाजपचे अनेक निष्ठावंत नेते नाराज आहेत. लोकसभा निवडणूक होऊ द्या, हे नेते बाहेर पडतील असेही भाकीत आ. रोहिती पवार यांनी केले.
पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिरासमोर, संत नामदेव महाराज समाधी स्थळ येथे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह तुतारी चे लोकार्पण आ. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तुतारी हे चिन्ह आ. पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी ठेवले, तसेच संत नामदेव महाद्वार येथे तुतारी फुंकून लोकार्पण केले. यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, अनिता पवार, माजी तालुकाध्यक्ष एड. दीपक पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात शाहू – फुले – आंबेडकर यांची, संतांची परंपरा शरद पवार यानी जपली आहे, तुतारीला हि अशीच परंपरा आहे, सामान्य लोकांच्या आनंदाच्या क्षणी आणि संघर्षाची सुरुवात करायची असेलत तेव्हा तुतारी वाजवली जाते असे हे चिन्ह आहे. येत्या निवडणुकीत लोक विरोधकांच्या तुताऱ्या वाजवतील असेही यावेळी आ. पवार यावेळी म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना आ. पवार म्हणाले कि, भाजप देशाचे अध्यक्ष जे पी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छोटे पक्ष संपवून टाका, भाजप एकमेव पक्ष राहिला पाहिजे असे सांगितले. याचा अर्थ आता आपण हुकूमशाहीकडे जात आहोत. २०२४ नंतर या देशात संविधान, लोकशाही राहणार नाही, शेतकरी, बेरोजगार युवक याना संविधानाने दिलेला लढायचा हक्क हिरावला जात आहे. म्हणून हुकूमशाहीकडे जायचे नसेल तर भाजपला सत्तेबाहेर ठेवावे लागेल, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.