वाडीकुरोली 9 : 0 काळे गटाचा दणदणीत विजय

विठ्ठलचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार गटाचा पराभव

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील वाडीकुरोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहकार शिरोमणी वसंतदादा काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या गटाने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवत 9 विरुद्ध 0 असा दणदणीत विजय मिळवला आहे. काळे गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

दरम्यान , एकूण ग्रामपंचायत निकालात परिचारक गटाचे वर्चस्व कायम असल्याचे दिसत आहे. शिरढोन ग्रामपंचायतीवर भालके -परिचारक गटाने सत्ता मिळवली आहे. नांदोरे परिचारक काळे गट 4 बबनदादा, भालके गट 5 जागा जिंकल्या आहेत. नेपतगाव येथे स्थानिक आघाड्यांना समान 3 जागा मिळाल्या आहेत तर अपक्ष 1 उमेदवार विजयी झाला आहे.

विटे ग्रामपंचायत मध्ये एक नंबर प्रभागात इंदुमती वगसिद्ध पुजारी आणि रुक्मिणी बापू पुजारी या दोन्ही उमेदवारास 144 अशी समान मते मिळाली तर नोटा स 1 मत मिळाले. असल्याने चिट्ठी काढून रुक्मिणी बापू पुजारी या उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. येथे भालके गटाने 4 तर परिचारक 3 जागा मिळाल्या आहेत.

वाडीकुरोली ग्रामपंचायतीच्या निवडणूकिकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत कल्याणराव काळे यांची प्रतिष्ठा पणास लागली होती. चिलाईवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिचारक गटाने जोरदार मुसंडी मारली असून विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्या गटाचा 5 विरुद्ध 4 असा पराभव केला आहे.

वाडीकुरोलीत सर्व जागांवर महिला विजयी

निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काळे गटाने सर्वच्या सर्व 9 जागा जिंकून विरोधी गटाचा धुव्वा उडवला आहे. तरीही विरोधी आघाडीने लक्षवेधी मते मिळवली आहेत. काळे गटाचे कांताबाई सोनवले, अर्चना धनंजय काळे, लाडाबाई काळे, शोभा प्रकाश कुंभार, राजाबाई बजरंग काळे, अर्चना राजेंद्र काळे, जनाबाई रघुनाथ चव्हाण, सुनीता रामचंद्र काळे, सुप्रिया योगेश काळे या महिला विजयी झाल्या आहेत.

तर विरोधी गटाकडून 2 पुरुष उभा होते त्यांना ही महिला उमेदवारांनी पराभूत केले. देवडे ग्रामपंचायत मध्ये 9 जागा काळे,भालके,परिचारक यांच्या महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!