ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी

महाराष्ट्रात आवाज कुणाचा ? आज कळणार

टीम : ईगल आय मीडिया

ग्रामीण महाराष्ट्राचा जनादेश स्पष्ट करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज लागणार असून राजकीय क्षेत्राचे या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षामध्ये कोण सरस ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करण्यास आणि विजयी मिरवणूक काढण्यास बंदी असून थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्याच्या ग्रामीण भागावर वर्चस्व कोणाचे? सत्ताधारी महाविकास आघाडी की भाजप? हे आज ठरणार आहे.

यापूर्वी च एकूण १५२३ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूका झाल्या आहेत. राज्याच्या ३४ जिल्ह्यांतील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी झाले होते. मतदान
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!