शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेही झाली आक्रमक
टीम : ईगल आय मीडिया
हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे. कालपासून काँग्रेस, राष्ट्रवादी ने योगी सरकारच्या राजीनाम्याची मागणी करीत निषेधाचे हत्यार उपसले आहे. त्या पाठोपाठ आता शिवसेना ही आक्रमक झाली आहे. आज चर्चगेट समोर शिवसेनेने योगी च्या विरोधात घोषणाबाजी करीत जोरदार निदर्शने केली.
करमाळा येथे योगीच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. सकाळपासून चर्चगेटसमोर निदर्शनं करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून सुशांत सिंह प्रकरणी शिवसेनेवर आरोप होत आहेत. आता हाथरसचा मुद्दा समोर ठेवून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना नेते शिशिर शिंदे हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधीच्या बाबतीत2 पोलिसांनी केलेल्या दंडगाईचा निषेध केला तर खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट योगीं च्या राजीनाम्याची मागणी केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना केलेल्या धक्काबुक्की चा निषेध केला आहे. राज ठाकरे यांच्या मनसेनेही निषेधाचा सूर लावल्याने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष भाजप विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आता शिवसेनेने निदर्शनं सुरु केली आहेत. हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. तिला मारहाण करण्यात आली. मोदी सरकार हाय हाय अशाही घोषणा देण्यात येत आहेत