भाजपला धक्का : जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरे सेनेत प्रवेश करणार

उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन घेतली भेट

जळगाव : eagle eye news
भाजपचे सध्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्या ( गुरुवारी ) शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांची ही नाराजी भाजपला जळगाव लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकते. कारण उन्मेष पाटील यांची चाळीसगावात मोठी ताकद आहे. भाजपकडून उन्मेष पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकिट कापण्यात आलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी बारा वाजता उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत पारोळाचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांनी आज सकाळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे.


संजय राऊत हे उन्मेष पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उन्मेष पाटील हे गेले आहेत. त्यामुळे मला अजूनही असं वाटतं की उन्मेष पाटील हे असा काही निर्णय घेणार नाहीत. मी प्रचारामध्ये आहे. त्यामुळे मी अशी कुठली बातमी बघितली नाही. मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी या घडणार नाहीत. मी माझ्या तत्त्वांशी आजपर्यंत तडजोड केली नाही. एकनिष्ठ राहिले. पक्षासोबत एकनिष्ठ राहणा-या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता ही उभी राहील, अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिली.

महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटासाठी सुटला आहे. ठाकरे गटाकडून या जागेसाठी उमेदवाराची घोषणा झालेली नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते हर्षल माने, नुकतेच भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्या ललिता पाटील आणि इतर काही इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत होती.

Leave a Reply

error: Content is protected !!