या मंत्र्याने केला शिवसेनेत प्रवेश
टीम : ईगल आय मीडिया
नेवासा ( जि . अहमदनगर ) चे अपक्ष आमदार आणि राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यानी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे गडाख यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष लढवली, नंतर भाजपसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वीच शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले होते. महाविकास आघाडी सरकार तयार झाल्यानंतर गडाख यांची सेनेच्या कोट्यातून मंत्रिपदी वर्णी लागली.
मंत्रिपद मिळाल्यानंतर
सुमारे 8 महिन्यानंतर गडाख यांनी मंगळवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून गडाख यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
शिवसेना पक्ष आणि आपले विचार जुळतात, शेतकरी, सामान्य कष्टकरी यांचा विचार करणारा पक्ष शिवसेना आहे.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर आहे म्हणून आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे गडाख यांनी ट्विट केले आहे.