राष्ट्र्वादीत घर वापसी : मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश ठरला !

अकलूज येथे भव्य शक्ती प्रदर्शन होणार

पंढरपूर : eagle eye news

सोलापुर जिल्ह्यसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणास कलाटणी मिळणारी घटना घडत असून मोहिते पाटील येत्या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षात प्रवेश करणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशांनंतर त्यांना माढा लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर होईल. त्याचबरोबर माढा, सोलापूर, सांगली, सातारा, बारामती लोकसभा मतदार संघात आणि पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत याचा जबर धक्का भाजपला बसण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश अखेर निश्चित झालेला असून शनिवारी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात धैर्यशील मोहिते – पाटील हे राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यावेळी त्याच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील गटाचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश मात्र यावेळी होणार नसून ते यावेळी गैरहजर असतील असे सांगितले जाते. मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा दीर्घकालीन परिणाम जिल्ह्यच्या राजकारणावर होणार आहे. राज्याच्या राजकारणात भाजपला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!