भाजपचे खा. जयसिद्धेश्वर स्वामी आले अडचणीत !


बनावट जातीचा दाखला बनवणाऱ्याला अटक

सोलापूर : ईगल आय मीडिया

सोलापूरचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या बनावट जातीचा दाखला प्रकरणी अडचणीत वाढ झाली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्या आरोपीस आज पोलिसांनी अटक केली आहे. शिवसिद्ध बुळा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

खा. जय लसिद्धेश्वर महास्वामी यांनी 2019 ची लोकसभा निवडणुक सोलापूर ( अनु.जाती राखीव ) मतदारसंघातुन लढवली असून त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला आहे. मात्र डॉ.स्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार अपक्ष उमेदवाराने केली होती. त्यानुसार जात पडताळणी समितीने चौकशी केली असता प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार डाॅ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता.
यानंतर डाॅ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी जातीचा बनावट दाखल तयार केला होता. हा बनावट दाखला बनवणाऱ्या शिवसिद्ध बुळा याला पोलिसांनी अटक केली आहे.

त्यामुळे खा. स्वामी यांच्या खासदारकी वर टांगती तलवार आहे. याच प्रकरणात पोलिसांनी आज बनावट दाखला बनवला म्हणून आरोपी शिवसिद्ध बुळा यास आज अटक केली आहे. त्यामुळे स्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!