भाळवणी गटात राष्ट्रवादीच नंबर वन

लोकसभा, विधानसभेपाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीत ही राखले वर्चस्व !

भाळवणी गटात गावनिहाय निवडून आलेले सदस्य

पंढरपूर : ईगल आय मीडिया

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाळवणी गटात सर्वाधिक ग्रा.पं. सदस्य निवडून आणले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या गटातून मताधिक्य मिळवल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादी ने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.

ग्रामपंचायत निवडणुक निकालातुन भाळवणी गट हा राष्ट्रवादी पार्टीचाच बालेकिल्ला बनल्याचे दिसुन आले.
गटातील १० गावामध्ये निवडणुक लागली होती.
त्यापैकी जैनवाडी हे गाव बिनविरोध करुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.दिपकदादा पवार यांनी विजयी सलामी दिली होती.

भाळवणी गटामध्ये एकुण १०८ सदस्यसंख्या असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ४३,परिचारक गट ३७ ,काळे गट २३,तर सेना २ , अपक्ष व स्थानिक गट ३ असे एकुण बलाबल आहे. जवळपास निम्म्या जागेवरती विजय मिळवत प्रस्थापित नेत्यांना हादरे देण्यात राष्ट्रवादीची नव्या दमाची तरुण मंडळी यशस्वी झाली आहे.

ऍड. दीपक पवार यांच्या नेतृत्वाचे यश !
त्यानंतर ॲड.दिपक दामोदर पवार यांची तालुकाध्यक्ष म्हणुन निवड झालेनंतर गावोगावी युवकांची फळी उभी करण्यात ते यशस्वी झाले.त्यामुळेच मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काळे व परीचारक हे मातब्बर नेते एकत्र असताना देखील भाळवणी गटातुन व तालुक्यातुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस मतदान झाले.
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तरुणांची ही भक्कम फळी निर्णायक ठरेल हे नक्की.

Leave a Reply

error: Content is protected !!