ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा ; १ लाख रू. बक्षिस : अभिजित पाटील

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येत्या 23 तारखेपासून ग्रामपंचायतचे उमेदवारी फॉर्म भरणे व 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये यासाठी अभिजीत पाटील यांच्यावतीने  पंढरपूर तालुक्यात ज्या बिनविरोध ग्रामपंचायत होतील त्यांना यांच्यावतीने १लाख रू. बक्षिस म्हणून देण्याची नाविन्या पुर्ण संकल्पना जाहिर केली

कोरोनामुळे पंढरपूर तालुक्याची खुप मोठी हानी झाली आहे. अजून ही कोरोनाचा धोका संपला नाही.जनसामान्यांना कोरोनाचा व अतिवृष्टीचा मानसिक आणि आर्थिक फटका बसल्याने जनसामान्याचे जीवन विस्कळीत झाले आहे.

याकाळामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातील वाद विवाद,गट तट बाजूला ठेवत ग्रामपंचायत बिनविरोध करावी. गावातील होतकरू, निर्व्यसनी,योजनाची माहिती असणारे तरूणांनी व सर्व जेष्ठांनी आपल्या गावासाठी सहभागी व्हावे. यातूनच गावाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल.

राज्यामध्ये शिवसेना – काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तीन टोकाच्या विचारांचे तीन पक्ष एकत्र येऊन जर सरकार स्थापन करू शकतात तर आपल्याला आपल्या गावामध्ये आपली ग्रामपंचायत बिनविरोध का करू शकत नाही. हि विचार करण्याची बाब आहे असेही पाटील म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!