पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा आता घासून नाही, ठासून येणार

माचनुर येथील भगीरथ भालके प्रचार सभेत समर्थकांची तुफान गर्दी

पंढरपूर : प्रतिनिधी

गेल्या पोटनिवडणुकीत ३ हजार मतांनी पराभव झाला, मात्र आता ३० हजार मतांनी विजयी होऊ, आता घासून नाही तर ठासून येऊ, असा निर्धार काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेत भालके समर्थकांनी व्यक्त केला.माचणुर ( ता. मंगळवेढा ) येथे भालके यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला. यावेळी खा. प्रणिती शिंदे, माजी आ.दिलीप माने, भगीरथ भालके, ऍड.नंदकुमार पवार, ऍड.गणेश पाटील, श्रीमती जयश्री ताई भालके, तानाजी खरात, पांडुरंग चौगुले, माजी सभापती संभाजी गावकरे, मारुती वाकडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने भालके समर्थक उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने मला पाठिंबा दिला, प्रेम दिले, आमच्यावर विश्वास दाखवला. मागील तीन वर्षात तालुक्यातील जनतेला, कार्यकर्त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. या त्रासातून मुक्तता करण्यासाठी प्रसंगी मी घर दार विकेन, पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी केले. यावेळी पुढे बोलताना भगीरथ भालके म्हणाले की, मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी स्व भारत नाना नी अखेरच्या श्वासापर्यंत काम केले. २४ गावची उपसा सिंचन नानांनी मंजूर करून घेतली, शासकीय आणि न्यायालयीन लढाई लढून तिचा पाठपुरावा केला, ४२ गावची प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना तसेच इतर अनेक विकास कामे नाना नी केली. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मला विजयी करावे, असेही आवाहन भगीरथ भालके यांनी केले.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी, लोकसभा निवडणुकीत पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील जनतेने मला ४५ हजार मतांचे लीड दिले. आपण टाकलेला विश्वास मी सार्थ करेन. काँग्रेस पक्ष भगीरथ दादांच्या पाठीशी भक्कम असून राहुल गांधींच्या सभेसाठी प्रयत्न करू, भारत नानांची मतदार संघातील विकासाची तळमळ मी सभागृहात पाहिली आहे, नानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथ ना विजयी करा, असे आवाहन खा. शिंदे यांनी केले.

पांडुरंग चौगुले यांना अश्रू अनावर ! दुष्काळी भागातील पाणी प्रश्नावर लढा उभा करणारे पाणी चळवळी चे नेते पांडुरंग चौगुले यांनी घणाघाती भाषण केले. दिवंगत भारत नाना यांनी ३५ गावच्या पाणी प्रश्नांसाठी केलेले काम आणि त्यांच्या निधनानंतर तालुक्यातील परिस्थिती यावर बोलताना पांडुरंग चौगुले यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या भावनिक भाषणामुळे उपस्थित हजारो कार्यकर्त्यांचे ही डोळे पाणावले.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा आता घासून नाही, ठासून येणार असे प्रतिपादन माजी नगरसेवक चेतन नरोटे यांनी केले. गेल्या पोटनिवडणुकीत ३ हजार मतांनी पराभव झाला, मात्र आता ३० हजार मतांनी विजयी होऊ, आता घासून नाही तर ठासून येऊ, असा निर्धार काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेत भालके समर्थकांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना धनगर समाजातील येड्रव येथील कार्यकर्ते काळे यांनी आपली व्यथा मांडताना मंगळवेढा तालुक्यात गेल्या तीन वर्षात धनगर समाजावर अन्याय झाला आहे. २००९ सालची पुनरावृत्ती यावेळी करुया अशी साद घातली.

Leave a Reply

error: Content is protected !!