मंगळवारी झुंबड ! 72 ग्रामपंचायतीसाठी 1327 उमेदवारी अर्ज

अर्ज दाखल करण्याचा बुधवार शेवटचा दिवस

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील 72 ग्रामपंचायतसाठी  मंगळवार ( दि 29 रोजी ) एकाच दिवशी 854 उमेदवारांनि 907 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या ( बुधवारी ) अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. यापूर्वी दाखल झालेले 420 असे एकूण 1 हजार 327 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

      23 डिसेंबर पासून 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर सलग तीन सुट्ट्या आल्यामुळे सोमवार पासून शेवटच्या 3 दिवसांत अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मंगळवारी दिवसभर चार ठिकाणी एकाच वेळी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र अर्ज भरणाऱ्या इच्छुक उमेदवाराची संख्या मोठी होती. त्यामुळे दुपारी 3 वाजता गेटच्या आत आलेल्या सर्व इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याचे काम रात्री 8 वाजेपर्यत चालू होते.

पहिल्या 3 दिवसांत 48 ग्रामपंचायत साठी 420 अर्ज दाखल झाले होते तर मंगळवारी 907 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून किती अर्ज दाखल होतात, कोणत्या ग्रामपंचायती बिनविरोध होतात याकडे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील कासेगाव, करकंब, भोसे, गादेगाव,वाखरी, भाळवणी, पटवर्धन कुरोली, सुस्ते, खर्डी, सरकोली, रोपळे आदी महत्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायत निवडनिकीकड तालुक्याचं लक्ष लागले आहे. या पैकी जैनवाडी ग्रा पं बिनविरोध झाली आहे तर, भोसे ग्रामपंचायतीची बिनविरोध होण्याची शक्यता दिसत आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!