अभिजित पाटील, बी पी रोंगे इच्छुज : पोटनिवडणूक रंगणार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी भाजप कडून आ. प्रशांत परिचारक, दमाजीचे चेअरमन समाधान अवताडे, dvp चे प्रमुख अभिजित पाटील आणि स्वेरीचे प्रमुख डॉ. बी पी रोंगे हे चार जण इच्छुक आहेत. या संदर्भात भाजपचे निरीक्षक माजी आमदार बाळासाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पंढरपूर पोटनिवडणूकिसाठी उमेदवार चाचपणी गतिमान झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.त्यांच्या विरोधात भाजप कडून इच्छुक उमेदवारांची नावे घेण्यात आली आहेत.
तत्पूर्वी मार्केट कमिटीच्या आवारात भाजप ची मीटिंग झाली. यावेळी आ परिचारक, माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, धैर्यशील मोहिते – पाटील, डॉ. बी. पी. रोंगे, अभिजित पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, पंढरपूर तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, शहराध्यक्ष विक्रम सिरसाट यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतली गेली. आजच राष्ट्रवादी ची मीटिंग झाली असून भाजप नेही चाचपणी केली असल्याने निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
आ. प्रशांत परिचारक यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे,मात्र पक्ष देईल त्याचाही प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे. तर दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे, dvp उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील, स्वेरी संस्थेचे सचिव डॉ.बीपी रोंगे यांनी ही इच्छुक म्हणून उमेदवारी मागणी केल्याचे भेगडे म्हणाले.