पंढरपूर तालुका : 1 ग्रामपंचायत तर 20 गावांच्या 84 जागा बिनविरोध

भोसे 11, फुलचिंचोली 12, सरकोली 7 मगरवाडी, देगाव प्रत्येकी 8 जागा बिनविरोध

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यातील 72 गावांच्या निवडणूकिसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 1643 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. तर 1573 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. फक्त जैनवाडी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे तर अन्य 20 गावातील 84 जागा बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज माघारी घेण्याची वेळ संपल्यानंतर ही रात्री उशिरापर्यंत काही गावातील लोक अर्ज माघारी घेण्यासाठी तहसील कार्यालयात तळ ठोकून होते, त्यामुळेच उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया नियमानुसार न होता सोयीनुसार झाल्याच्या तक्रारी काही गावांतून आल्या आहेत.

पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 3333 अर्ज दाखल झाले होते. 4 जानेवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे या दिवशी अर्ज माघारी घेण्यासाठी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, शासकीय गोदाम, रायगड भवन या ठिकाणी तुफान गर्दी उसळली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला होत. उमेदवाराच्या मिनतवाऱ्या, विनंत्या आणि अर्जव केली जात असल्याचे चित्र दिसत होते.

तालुक्यातील किती ग्रामपंचायत बिनविरोध होतात याकडे लक्ष1लागले होते मात्र केवळ जैनवाडी ही एकच ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकली. तर भोसे ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 11 जागा, फुलचिंचोली च्या 15 पैकी 12, सरकोली 13 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या. देगाव, मगरवाडी या गावांच्या प्रत्येकी 8 जागा बिनविरोध झाल्या तर शिरगाव 5, उपरी 4, गोपाळपूर 4, वाखरी 3,कोंढारकी 3, रांजनी 2, अजनसोंड, शंकरगाव, पोहोरगाव, कासेगाव, खेडभाळवणी, सांगवी, सुगाव भोसे या गावातील प्रत्येकी 1 जागा बिनविरोध झाली आहे.

दुपारनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. दरम्यान वाखरी, चिंचोली भोसे, गाडेगाव येथील उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यावरून रात्री बराच उशीर गोंधळ होता. संबंधित गावचे लोक अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली तरीही अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न करीत होते असे दिसून आले.

त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया नियमानुसार न होता सोयीनुसार झाल्याचा आरोप काही गावातील लोकांनी केला आहे. आज पासून तालुक्यात निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!