पोट निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन व पदाधिकारी यांची बैठक
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या स्व. आ. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेकरीता भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
याची दखल घेवून कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मतदान केंद्रे, सहाय्यक मतदान केंद्रे, मतदार नाव नोंदणीबी.एल. ए. नियुक्ती आदीबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पदाधिकारी यांची बैठक आज सोमवार दि. 15 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सायंकाळी 5 वा. आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
252-पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आ. भारत तुकाराम भालके यांचे निधन झाल्यने रिक्त झालेल्या जागेकरीता मा. भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. 252-पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोट निवडणूक 2021 च्या अनुषंगाने कोरोना विषाणू (कोविड 19)संसर्गाच्या पार्श्वभुमिवर ज्या मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या ही 1000 पेक्षा जास्त आहे.
अशा मतदान केंद्राच्या ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्राची उभारणी करणे, मतदान केंद्राच्या नावात बदल, पुर्वीच्या मतदान केंद्रााची इमारत मोडकळीस आल्याने मूळ मतदान केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर सहाय्यकारी मतदान केंद्राच्या ठिकाणी झालेला बदल, नावात झालेला बदल, रेसीड्युयल व्होटर (छायाचित्र नसलेले मतदार), नवीन मतदार नोंदणी व बी.एल. ए. नियुक्ती याबाबत सोमवार दि. 15 रोजी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
तरी या बैठकीस पंढरपूर -मंगळवेढा तालूक्यातील राजकीय पदाधिकारी यांनी उपथित रहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.