एकनाथ खडसे पुन्हा वंचितच : खा. हिना गाविताना संधी
टीम : ईगल आय मीडिया
विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात बाजूच्या कोपऱ्यात बसवण्यात आलेल्या माजी मंत्री पंकजा मुंढे आणि विनोद तावडे यांची भाजपने ‘ राष्ट्रीय मंत्री ‘ या हुच्च पदावर बोळवण केली आहे. खा हिना गावित यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी नियुक्ती करताना जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मात्र अजूनही वंचित, उपेक्षितच ठेवले आहे.
एके काळी स्वतःला मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजणारे माजी मंत्री विनोद तावडे यांना पक्षाने विधानसभेत उमेदवारीच दिली नाही. तर पंकजा मुंढे यांना उमेदवारी देताना त्यांच्या पराभवात
हातभार लावल्याचे बोलले जाते. जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी डावलून त्यांच्या कन्येस उमेदवारी दिली, मात्र त्यांनाही पराभूत करण्यासाठी दाणा – गोटा पुरवला गेल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर मागील 10 महिन्यांपासून हे तिन्ही जेष्ठ नेते पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
हे तिन्ही नेते राज्यात प्रभावी असल्याने त्यांना विधानपरिषद किंवा राज्यसभेत संधी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी असताना तिथेही पक्षाने राष्ट्रवादीतुन आलेल्या नेत्यांना संधी दिली. त्याचवेळी तावडे, मुंढे, खडसे यांना बाजूला सारले. शनिवारी पक्षाच्यावतीने विविध पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये विनोद तावडे आणि पंकजा मुंढे यांना ‘राष्ट्रीय मंत्री’ बनवले आहे. तर एकनाथ खडसे यांना संधीच दिली नाही. नंदुरबार च्या खासदार हिना गावित यांना मात्र पक्षाने राष्ट्रीय प्रवक्त्या बनवलं आहे. 10 महिन्यानंतर पक्षाने संधी देताना कमी महत्वाच्या पदावर बोळवण केल्याचे मानले जात आहे.