सांगलीत सत्तांतर : राष्ट्रवादी चे सूर्यवंशी महापौर

सांगलीत भाजप दुभंगली राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व

टीम : ईगल आय मीडिया
सांगली, मिरज कुपवाड महानगरपालिकेत सत्तापरिवर्तन झाले असून 4 वर्षांपूर्वी आलेली सत्ता भाजपला गमवावी लागली आहे. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मते मिळवून महापौर पदी विजयी झाले आहेत. भाजपचे नगरसेवक फुटल्यामुळे पक्षाला मिळालेली सत्ता गमवावी लागली आहे.

सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेचं महापौरपद पहिल्या अडीच वर्षांसाठी महिला उमेदवारासाठी राखीव होतं. तो कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठीच्या महापौरपदासाठी आज निवडणूक पार पडली. पालिकेची एकूण सदस्यसंख्या ७८ असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे आहे. थेट गणित केल्यास भाजपचा विजय सहज वाटत होता. मात्र पडद्यामागे जयंत पाटील यांनी आधीपासूनच व्यूहरचना आखली होती आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रवादीला अपेक्षित सर्व काही घडलं. 

पुन्हा एकदा सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादी चा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला असून भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे. पुढील वर्षी सांगली मनपाची निवडणूक होत असून त्यापूर्वी च पालिकेत सत्तांतर झाले असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे.

भाजपचे खा. संजय पाटील हे अगोदरच नाराज असून ते पक्ष सोडणार असल्याचे बोलले जात आहे. पुढील वर्षी सांगली, मिरज, कुपवाड मनपाची, तसेच सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज झालेले सत्तांतर महत्वाचे मानले जात आहे.

आज झालेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदी दिग्विजय सुर्यवंशी यांची 39 मतांसह निवड झाली तर भाजपचे भाजप च्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मते मिळाली. भाजपची सहा मत फुटली तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले, त्यामुळे च सत्ता गमवावी लागली आहे.

मागासवर्गीय समिती सभापती स्नेहल सावंत यांच्यासह महेंद्र सावंत, नसीमा नाईक, अपर्णा कदम सहयोगी सदस्य विजय घाटगे यांनी आघाडीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. दोन नगरसेवक मतदान प्रक्रियेसाठी गैरहजर राहिले. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय सुकर झाला.

याचा परिणाम पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होणार आहे. काँग्रेसचे मंत्री विश्वजित कदम यांनीही या सत्तांतरामध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.

Leave a Reply

error: Content is protected !!