शिवसेनेच्या उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मते

सर्वच उमेदवारांची अनामत झाली जप्त

टीम : ईगल आय मीडिया

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत उमेदवार उभे केले होते, पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना ५० जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने २२ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व २२ जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला जेडीयूने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट चिन्ह दिले, पण नापसंत पडल्याने आयोगाने तुतारी वाजवणारं चिन्ह शिवसेनेला दिलं होतं.


२०१५ मध्ये लढवल्या ८० जागा : 2 लाखांवर मते
सन २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने २४३ जागांपैकी ८० जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडणूक आला नाही. मात्र, शिवसेनेला एकूण 2 लाख 11 हजार 131 मते मिळाली होती. त्यात हयाघाट, बोचहा, दिनारा जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब आणि मोरवा या सात विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. विशेष म्हणजे एकूण ३५ जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही अधिक मते मिळाली होती.

मतमोजणीत दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मतदान झाल्याचं दिसून आलं.
शिवसेनेच्या उमेदवारांना झालेलं मतदान


मनीष कुमार – पालीगंज मतदारसंघ – १०७ मते
ब्युटी सिन्हा – गया शहर मतदारसंघ – १४५ मते
मृत्युंजय कुमार – वजीरगंज मतदारसंघ – ६८ मते
संजय कुमार – चिरैय्या  मतदारसंघ – मते ३०५
संजय कुमार झा – बेनीपूर मतदारसंघ – मते ७५४
रंजय कुमार सिंह – तरैय्या मतदारसंघ – मते ३७८
विनिता कुमारी – अस्थवां मतदारसंघ – १८० मते
रवींद्र कुमार – मनेर मतदारसंघ – १४१ मते
जयमाला देवी – राघोपुर मतदारसंघ – मते १२२
विनोद बैठा – भोरे मतदारसंघ – मते ६९६
शंकर महसेठ – मधुबनी मतदारसंघ – मते ३२२
प्रदीप कुमार सिंह – औराई मतदारसंघ  – मते ३३१
शत्रूघन पासवान – कल्याणपुर  मतदारसंघ – मते १०३२
सुभाषचंद्र पासवान – बनमंखी मतदारसंघ – मते १३१
नवीन कुमार मल्लीक – ठाकूरगंज मतदारसंघ – मते ७०७
कुंदन कुमार – समस्तीपुर मतदारसंघ – मते ४६
पुष्पांकुमारी – सराय रंजन मतदारसंघ – मते २६९
मनीष कुमार – मोरवा मतदारसंघ – मते २१०
शिवनाथ मल्लीक – किशनगंज मतदारसंघ – मते २०१
चंदन कु. यादव – बहादुरगंज मतदारसंघ – मते ११६६
गुंजा देवी – नरपरगंज मतदारसंघ – मते १२५
नागेंद्र चंद्र मंडल – मनिहारी  मतदारसंघ – मते ४९६ मिळाली आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!