उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार

पंढरीत शिवसेनेच्या शिवगर्जना अभियानास प्रचंड प्रतिसाद 

प्रतिनिधी : eagle eye news

पंढरपूर शिवसेनेच्या शिवगर्जना अभियानास गुरुवारी संत तनपुरे महाराज मठ येथे आयोजित मेळाव्याच्या माध्यमातून सुरुवात झाली. या मेळाव्यास उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते विजय कदम, शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार उल्हास पाटील, युवा सेनेचे साईनाथ दुर्गे, कु.सुप्रजा फातर्पेकर, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, युवा सेना सोलापूर संपर्क प्रमुख उत्तम आयवळे,  साईनाथ अभंगराव, कैलास चव्हाण आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा तालुक्यातील सर्व आजी – माजी पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पप्पू तांबोळी, सचिन बंदपट्टे, राजश्री क्षीरसागर, दत्ता धोत्रे, निखिल पवार, महेश मोरे, भाजप युवा मोर्चा सचिव किरण सुतार, बजरंग कानगुडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.         

              या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी, ईडी आणि सीबीआय यांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करीत भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत षडयंत्र रचले. पण राज्यातील सर्वसामान्य जनतेला हे अजिबात रुचले नाही. पुढील प्रत्येक निवडणुकीत जनता याना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.  यावेळी बोलताना माजी खासदार सुभाष वानखेडे, ज्यांना शिवसेनेने मोठे केले, ज्यांना इतर कुठल्याही पक्षात संधी मिळाली नसती अशा कार्यकर्त्यांना केवळ बाळासाहेब ठाकरे या नावाने मोठेपण मिळवून दिले असे काही लोक आज आपल्या मुळावर उठले आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्याविषयी निष्ठा वाहिलेले हजारो – लाखो शिवसैनिक आता आणखी एक लढा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत.     


               या वेळी जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ,माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनम अभंगराव, तालुका प्रमुख संजय घोडके, डॉ.राजश्री क्षीरसागर, शहर प्रमुख रवी मुळे, रणजित बागल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.   


         यावेळी माढा जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे, युवासेना विस्तारक उत्तम आयवळे, काशिनाथ बासुतकर,  आशा टोणपे, स्वप्नील वाघमारे, गणेश इंगळे, सुधीर अभंगराव, नामदेव वाघमारे, राजाभाऊ गायकवाड, जयवंत माने, कमरुद्दीन खतीब,अकलूज शहर प्रमुख अनिल बंदपट्टे, संगीता पवार, पूर्वा पांढरे, प्रवीण शिंदे, आकाश माने, योगेश चव्हाण,शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर, विलास चव्हाण, माउली मासाळ, संतोष धोत्रे, कल्याण कवडे, उत्तम कराळे, बाळासाहेब पवार, उमेश काळे, शिवाजी जाधव, सोमनाथ आनपट, नाना सावंतराव, विनय वनारे, अविनाश वाळके, तानाजी मोरे, माउली अष्टेकर,  दत्ता यादव, बंडू घोडके, समाधान जगदाळे यांच्यासह विविध आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील गावडे यांनी केले.          

Leave a Reply

error: Content is protected !!