महिंद्रा थार रॉक्सचे कलर ऑप्शन आणि सर्व मॉडेल्सच्या किमती पहा
टीम : ईगल आय न्यूज
बहुचर्चित आणि भारतीय कार मार्केटमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केलेल्या महिंद्रा थार चे ५ दरवाजे असणारे नवीन एडिशन महिंद्रा थार रॉक्स चे दमदार आगमन झाले आहे. या गाडीचे बुकिंग ऑक्टोबर मध्ये सुरु होत असून भारतीय बाजारपेठेत नवीन महिंद्रा थार रॉक्सच्या आगमनानंतर कॉम्पॅक्ट आणि मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये खळबळ उडाली आहे.
महिंद्रा अँड महिंद्राने 5 डोअर थार रॉक्ससह सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज असलेल्या या नवीन थार रॉक्समध्ये यावेळी बरीच फीचर्स देण्यात आली आहेत. आणि त्यामुळे या एसयूव्हीची देशभरात चर्चा होत आहे. खास वाचकांसाठी महिंद्रा थार रॉक्सच्या सर्व मॉडेल्सच्या किंमती, सर्व कलर पर्याय, गाडी प्रत्यक्ष कधीपासून मिळणार हे वाचा.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने सध्या नवीन थार रॉक्स एसयूव्ही MX1, MX3, AX3L, MX5, AX5L आणि AX7L सारख्या ट्रिम लेव्हलमध्ये 14 व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे, जे सर्व रियर व्हील ड्राइव्ह पर्यायामध्ये आहेत आणि त्यांच्या किंमती खालीलप्रमाणे आहेत.
महिंद्रा थार रॉक्स MX1 पेट्रोल एमटी – 12.99 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स एमएक्स१ डिझेल एमटी – 13.99 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स MX3 पेट्रोल ऑटोमॅटिक – 14.99 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स MX3 डिझेल एमटी – 15.99 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स MX3 डिझेल ऑटोमॅटिक – 17.49 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स AX2L डिझेल मॅन्युअल – 16.99 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स MX5 पेट्रोल मॅन्युअल – 16.49 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स MX5 पेट्रोल ऑटोमॅटिक –17.99 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स MX5 डिझेल मॅन्युअल –16.99 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स MX5 डिझेल ऑटोमॅटिक – 18.49 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स AX5L डिझेल ऑटोमॅटिक – 18.99 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स AX7L पेट्रोल ऑटोमॅटिक – 19.99 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स AX7L डिझेल मॅन्युअल – 18.99 लाख रुपये, महिंद्रा थार रॉक्स AX7L डिझेल ऑटोमॅटिक – 20.49 लाख रुपये
महिंद्रा थार रॉक्स बुकिंग आणि डिलिव्हरी
महिंद्रा थार रॉक्सचे बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि या वर्षी दसऱ्यापासून लोकांना 5 डोअर थार रॉक्सची डिलिव्हरी मिळणार आहे. 14 सप्टेंबरपासून लोकांना महिंद्रा शोरूममध्ये जाऊन थार रॉक्सची टेस्ट राइड घेता येणार आहे.
Mahindra Thar Roxx ची फीचर्स
नवीन महिंद्रा थार रॉक्सचा लूक जितका पॉवरफूल आहे तितकाच त्याची फीचर्सही आधुनिक आहेत. यामध्ये लेव्हल 2 ADAS, पॅनोरॅमिक सनरूफ, 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, लेदर सीट अपहोल्स्ट्री यासह इतर अनेक फीचर्स आहेत. चला, आता आम्ही तुम्हाला नवीन थारचे सर्व रंग पर्याय एक-एक करून दाखवू.
महिंद्रा थार रॉक्सचे कलर ऑप्शन खालील प्रमाणे: महिंद्रा थार रॉक्स बॅटलशिप ग्रे, महिंद्रा थार रॉक्स बर्ंट SIENNA, महिंद्रा थार रॉक्स डीप फॉरेस्ट, महिंद्रा थार रॉक्स एव्हरेस्ट व्हाईट, महिंद्रा थार रॉक्स नेबुला ब्लू, महिंद्रा थार रॉक्स स्टेल्थ ब्लॅक