आत्महत्या करणारे भारतीय सेलेब्रेटीज

टीम : ईगल आय मीडिया
आघाडीचा बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडसह देश हादरला आहे. एवढे मोठे लोक आत्महत्या का करतात असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो. भारतात आत्महत्या करणारा सुशांत पहिला आणि एकमेव नाही हे समोर येत आहे. ग्लॅमर आणि पैसा, प्रसिद्धीच्या मोहाने या झगमगीत जगात आल्यानंतर जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहणे, अधिक पुढे जाणे यासाठी जीवतोड मेहनत करावी लागते. अनेक कलाकारांच्या करियरला उतरती कळा लागते, अनेकांना अपेक्षेनुसार यश मिळत नाही, काम मिळत नाही, तीव्र स्पर्धा, मानहानी, नको ती तडजोड करावी लागणारे प्रसंग यामुळे कॅमेऱ्याच्या प्रकाशात उजळलेल्या चेहऱ्यांची दुसरी काळवंडलेली बाजु अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्यानंतर समोर येते. तेवढ्या पुरती चर्चा होते. कालांतराने नवीन सुशांत, नवीन दिव्या भारती, अपूर्व अग्निहोत्री, नवीन सिल्क स्मिता समोर येते. यापूर्वी आत्महत्या केलेल्या इतर काही सेलिब्रिटींची थोडक्यात माहिती ईगल आय मीडियाच्या वाचकांसाठी ..
* दिशा सालिया
ही सुशांतची मॅनेजर होती काही दिवसांपूर्वीच तिनेही १४ व्या मजल्यावरुन उडी घेऊन तिचं आयुष्य संपवलं दिशा सालिया ही सुशांतची मॅनेजर होती, ९ जून रोजी तिनेही १४ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली.
* गुरुदत्त
१९६० च्या दशकातील आघाडीचे अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांनीही झोपेच्या गोळ्यांचा डोस घेऊन आत्महत्या केली होती.
*दिव्या भारती
१९९१ साली दिवाना, शोला और शबनम, रंग, दिल का क्या कसूर अशा चित्रपटामुळे अल्पवयात आघाडीचे स्थान पटकावलेली अभिनेत्री दिव्या भारती हीचा मृत्यू असाच अकाली आणि संशयास्पदरीतीने झाला.
*अपूर्व अग्निहोत्री
परदेस, आणि जस्सी जैसी कोई नही, प्यार कोई खेल नहीं मधून स्टार बनलेला अपूर्व अग्निहोत्री यानेसुद्धा आत्महत्या केली होती.
* नफिसा खान
आमिरखान सोबतच्या गजनी, अमिताभ सोबतच्या निशब्द अशा चित्रपटांमुळे स्टार बनलेली जिया खान उर्फ नफिसा हिनेसुद्धा आत्महत्या केली. तिचा मृत्यू संशयास्पद असून अभिनेता आदित्य पांचोली चा मुलगा सूरज पांचोली यात आरोपी असल्याचे तिच्या आईचे म्हणणे आहे. या मृत्यूचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे
*नितीन कपूर
अभिनेते जितेंद्र यांचे चुलत भाऊ आणि अभिनेत्री जयसुधा हीच पती नितीन कपूर यांनीही काम मिळत नसल्याने आयुष्य संपवलं,
*सिल्क स्मिता
साऊथ ची हॉट अभिनेत्री सिल्क स्मिता हीने आत्महत्या होती. सिल्क स्मिताच्या जीवनावर बेतलेला डर्टी पिक्चर हा विद्या बालन , नसिरुद्दीनचा सिनेमा तुफान गाजला होता.
*अभिनेत्री विजयश्री
हिंदी, कानडी, तमिळ या भाषांमध्ये अधिराज्य करणाऱ्या विजयश्री या अभिनेत्रीनेही १९७० मध्ये आत्महत्या केली होती.
*जेष्ठ अभिनेत्री परवीन बॉबी
एकाकीपणामुळे आलेल्या नैराश्यातून अभिनेत्री परवीन बाबीने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. तिच्या घराबाहेर असलेले पेपर आणि दूध हे तीन दिवसांपासून पडून होते. घराचा दरवाजा फोडल्यानंतर पोलिसांना तिचा मृतदेह आढळला
*साऊथ हिरो उदय किरण
दक्षिणेत अल्पवयात सेलिब्रेईटी बनलेल्या उदय किरण या साऊथ स्टारनेही आत्महत्या केली होती. त्यामागचं कारण समजू शकलेलं नाही
या शिवाय दाक्षिणात्य अभिनेते श्रीनाथ, विवेका बॅनर्जी या मॉडेल आणि अभिनेत्रीनेही नैराश्य आल्याने आत्महत्या केली.
नफिसा जोसेफ या मॉडेलने लग्न न टिकल्याचा धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केली.
प्रत्युषा बॅनर्जी या टीव्ही अभिनेत्रीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुलजीत रंधावा या टीव्ही अभिनेत्रीचा मृतदेहही गळफास लावलेल्या अवस्थेत तिच्या घरीच सापडला होता .
कुशल पंजाबी या अभिनेत्यानही डिप्रेशन सहन न झाल्याने आयुष्य संपवले.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली.
३२ वर्षीय अभिनेता मनमीत ग्रेवाल याने आर्थिक संकट कोसळल्यामुळे आत्महत्या केली.

फोटो क्र 1 ) उदय किरण, 2) गुरू दत्त 3)अपूर्व अग्निहोत्री 4)सिल्क स्मिता 5) नितीन कपूर

Leave a Reply

error: Content is protected !!