अरबी समुद्रात उठलेले निसर्ग हे चक्रिवादळ कोकनात हाहाकार माजवून आता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर कड़े कूच करू लागले आहे. ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून जोराचा पाऊसही सुरु झाला आहे. हजारो झाड़े कोसळून पडलेली आहेत. घरे, विजेचे खांब कोसळले आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप प्राप्त झाली नसली तरी मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनकडून सांगितले जात आहे.
गुरुवारी हे वादळ पुणे , नाशिक पार करुन अहमदनगर जिल्हा ओलांडून खान्देशात जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलि आहे.
क्षणचित्रे निसर्ग चक्री वादळाची !