चिंचणीकरांनी लॉकडाऊन काळात श्रमदानातून जपली 6 हजार झाडे
पंढरपूर :ईगल आय मीडिया
सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आसून प्रत्येकाने मृत्यूच्या भीतीने स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे. मात्र अशा जीवघेण्या संकटात ही संधी शोधणाऱ्या पुनर्वसीत चिंचणी ( ता. पंढरपूर ) या गावाने कोरोना च्या धास्तीने घरात बंदिस्त न होता प्रशासनाने घालून दिलेल्या ‘सोशल डिस्टन्स’ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत गावात स्वखर्चातून लावलेल्या 6 हजारांपेक्षा जास्त झाडांचे श्रमदानातून संगोपन केले आहे. या पुनर्वसित गावाने आपल्या एकीच्या जोरावर ऐन उन्हाळ्यात गावात वृक्ष लागवड, संगोपन, स्वछता, यासारखे उपक्रम राबवत संकटात समाधान’ नवीन संधी शोधण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. आपल्या याच एकीच्या जोरावर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी धडपडणाऱ्या या गावाने कोरोनाला हरविण्याचा निर्धार केला आहे.
सध्या कोरोना विषानुुने संपूर्ण जग भयभीत झाले आहे. भीतीपोटी अनेक नागरिक स्थलांतर करत असल्याने शहरे ओस पडत आहेत. याचा ग्रामीण जीवनावरही मोठा परिणाम होत असून सर्वसामन्य नागरिकांना ना शेती, ना व्यवसाय करता येत नसल्याने नागरिक हतबल झाले असताना पुनर्वसित चिंचणी ग्रामस्थांनी मात्र या कोरोना आपत्तीवर रडत न बसता या जीवघेण्या संकटात ही नवनवीन संधी शोधत आहेत. या गावातील नोकरी निमित्त पुणे-मुंबई यासारख्या शहरात असणारे तरुणही सध्या गावात वास्तव्यास आहेत. ग्रामस्थांची शेती ही गावालगत असल्याने शेतीची कामे करत असताना ग्रामस्थ पर्यावरण संतुलन, स्वछता, वृक्षारोपण, संगोपणासाठी सकाळचा महत्वाचा वेळ स्वतःहून देत आहेत.
पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेतलेल्या या पुनर्वसित गावाने आपल्या विस्तापितांनंतर स्व खर्चातून गावात तब्बल 6 हजारांपेक्षा जास्त विविध प्रकारची झाडे लावली आहेत. लॉकडाऊन काळात मिळालेल्या मोकळ्या वेळेचा उपयोग या झाडांची आळी करणे, पाणी घालणे, छाटणी, झाडाखाली पडलेला पालापाचोळ्याचा गांडूळखत निर्मिती करून त्याच झाडांना टाकणे, ड्रीप करून पाण्याची सोय करणे आदी महत्वाची कामे ग्रामस्थांकडुन उस्फुर्त पणे सुरू आहेत. दररोज सकाळी गावातील तरुण, वृद्ध, महिला, शालेय विध्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत त्यामुळे ऐनउन्हाळ्यात गाव हिरवाईने नटले आहे. वृक्ष लागवड, संवर्धन, या कामानंतर गावातील अंतर्गत स्वच्छतेवर ही भर दिला आहे. त्यामुळं गाव सुंदर, स्वच्छ,निरोगी, पर्यावरणपूरक होत आहे. शिवाय गावाच्या विकासासाठी पर्यावरण समतोलासाठी कायम एकवटलेल्या या गावाने आपल्या एकीच्या जोरावर कोरोनाला हरविण्याचा निर्धार केला आहे.
आम्ही सकाळी लवकर उठून सामाजिक अंतर ठेऊन आलेल्या झाडांना मातीची भर व आळी,ठिबक संच जोडणी,झाडांच्या बुडातील गवत इत्यादी कामे करण्यात आली.गेले महिना भर लॉकडाऊन च्या काळामध्ये रोज 2/3 तास सार्वजनिक ठिकाण च्या जागेवर काळजी घेत सर्वजन गावात भरपुर काम करत आहेत. संकट आहे ..पण संधी सुद्धा भविष्यातील स्वच्छ,सुंदर,सम्रुध्द,निरोगी… स्वयंपुर्ण ‘चिंचणी’ उभारण्यासाठी हातात हात घालुन काम सुरू आहे.
– मोहन अनपट
जिल्हाध्यक्ष मुक्ती दल