वारी चुको न दे हरी ! यंदाची आषाढी वारी वारकरी संप्रदायासाठी कसोटीचा काळ

पंढरपूर : सतीश बागल

सामाजिक समता, एकतेची परंपरा जपणारा वारकरी संप्रदाय. वारी ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे ही परंपरा सुरु असताना, यंदा कोरोना मारामारीच्या संकटामुळे हा परंपरा जपत सोहळा प्रातिनिधीक स्वरूपात पार पडणार आहे.
समस्त मानव जातीला कोरोना मारामारीचा मुकाबला करावा लागत असताना, वारकरी संप्रदायाने देखील प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार परंपरा कायम ठेवत सूचनांचे पालन करीत हा सोहळा पार पडण्याचे निश्चित केले आहे.
विविध संतांनी समाजातील वाईट प्रथा, अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करीत असताना मानव जातीवर आलेल्या नैसर्गिक संकटांचा मुकाबला करत असताना, मानवाचं मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळ पडला असताना संत तुकाराम महाराजांनी उदार भूमिका दाखवली होती. बरे झाले देवा निघाले दिवाळे असे एक ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे मंगळवेढ्यात संत दामाजी यांनी धान्याचे कोठार सामान्यांसाठी खुले केलं होतं. आज कोरोना महामारी मुळे समस्त मानव जात संकटात असताना, वारकरी संप्रदायाचा देखील कसोटीचा आणि संयम पाहणारा काळ आहे. सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस प्रत्येकाला असते. ते एक सामाजिक एकतेच, बंधुभाव जपण्याचे प्रतीक आहे. मात्र, कोरोना महामारी गेल्या तीन महिन्यांपासून मंदिर ही बंद ठेवावे लागले आहे. अशी परिस्थिती यापूर्वी कधी निर्माण झाली नव्हती.
या संकटातून सावरत असताना सर्वात मोठा असा आषाढी एकादशी सोहळा देखील अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत शासनाने घालून दिलेल्या सूचनांनुसार पार पडत आहे. या अडचणीच्या काळात वारकरी संप्रदाय जी भूमिका घेत आहे, ती कौतुकास्पद आहे.
शासनाकडून मिळणारे मदत तसेच देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, माध्यमांकडून देण्यात येणारी प्रसिद्धी यामुळे पालखी सोहळ्याने गेल्या काही वर्षांमध्ये व्यापक स्वरूप प्राप्त झाले. या सोहळ्यामध्ये दिंड्यांची संख्याही दरवर्षी वाढत गेली. यामध्ये व्यावसायिकता येऊन सुसूत्रता आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या संकटामुळे सोहळ्याला प्रथमच ब्रेक लागला आहे.

वारकरी संप्रदाय यासाठी एकूणच भाविक भक्तांसाठी हा संयमाचा आणि कसोटीचा काळ आहे. प्रातिनिधिक स्वरूपात पालख्यांचे यांचे प्रस्थान अन त्यानंतर थेट पादुका पंढरीत आणण्याचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. शासनाच्या निर्णयांना पाठिंबा देत महाराज मंडळींनी घेतलेली भूमिका व्यवहारिक आणि कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!