उद्या पंढरपूरचे सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले होतील

उद्या दुपारनंतर पाणी भीमेच्या पात्रात परत जाईल

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कालपासून पंढरपूर शहर आणि तालुक्यातील बंद असलेले सर्व रस्ते खुले होणार आहेत. सध्या पंढरीत भीमा नदीला 2 लाख 87 हजार क्यूसेक्स चा विसर्ग असला तरी सकाळ पर्यंत अहिल्या पुलासह सर्वच पूल1 वाहतुकीसाठी खुले होतील अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

उजनी धरणातून एकदम 2 लाख 50 हजार क्यूसेक्स तर वीर मधून 53 हजार क्यूसेक्स चा विसर्ग सोडल्यामुळे भीमा नदीला महापूर आला आहे. यामुळे तालुक्यातील भीमा नदीवरील सर्वच पूल पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर माण नदीला ही अतिवृष्टी मुळे पूर आल्याने सिद्धेवाडी, ओझेवाडी येथील पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान माण नदीची पाणी पातळी घटल्या नंतर पंढरपूर – मंगळवेढा मार्गावरील सिद्धेवादी पूल खुला झाला आहे. तर ओझेवाडी येथील पूल ही खुला झाल्याने त्या भागातील वाहतूक खुली झाली आहे. उजनीचा विसर्ग आता खूपच कमी केला असुन विरचा विसर्ग 4 हजार 300 वर आला आहे.

त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी संध्याकाळी 7 वाजता 2 लाख87 हजार क्यूसेक्स असून तासाला दीड ते दोन फूट पानी कमी होत आहे. वेग कमी असला तरीही सकाळी पंढरपूर तालुक्यातील सर्वच पूल वाहतुकीसाठी खुले होतील. उद्या लाख 40 हजार क्यूसेक्स ला अहिल्या पूल सुद्धा खुला होईल, असेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!