कोरोना बाधित कर्मचाऱ्याची गांधीगिरी आणि बँक व्यवस्थापनाची भंबेरी
टीम : ईगल आय मीडिया
बँकेच्या वरिष्ठांनी कोरोनाची लागण होऊन ऑक्सिजनवर असलेल्या एका कर्मचाऱ्यास कामावर हजर राहण्याचे फर्मान काढले आणि तो कर्मचारी नोकरी वाचवण्यासाठी चक्क ऑक्सिजन सिलिंडर सह तोंडाला ऑक्सिजन मास्क लावूनच बँकेत हजर झाला.
छत्तीसगड राज्यात बोकारो येथे पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचार्याने, वरिष्ठांनी सुटी नाकारल्यानंतर तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसह ऑक्सिजन मास्क लावलेल्या अवस्थेत कामावर पोहोचला अखेर त्याला बँकेच्या अधिकाऱ्यांनी घरी पाठवले.
ही घटना पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत घडली असून तेथे अरविंद कुमार कोविड 19 मधून बरे झाले असले तरी त्याच्या फुफ्फुसांना संसर्ग झाला आहे. तो घरीच उपचार घेेेत असून ऑक्सिजनवर आहे. परंतु बँक अधिकारी त्याच्यावर कार्यालयात येण्यासाठी दबाव आणला.
जेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचा रजा अर्जावर विचार केला नाही, तेव्हा त्यांनी आपला राजीनामादेखील सादर केला, तोही नाकारला गेला. आता त्यांना कामावर हजर नाही झाल्यास पगार कापण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे अरविंद कुमार याने ऑक्सिजन मास्क लावलेल्या अवस्थेत कामावर हजेरी लावली.
ऑक्सिजन लावलेल्या अवस्थेत अरविंद कुमार याना कामावर येण्यास भाग पाडले गेले आहे, ”असे बँकेत सोबत आलेल्या कुटुंबातील एकाने सांगितले. दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याने सोमवारी त्यांना ऑक्सिजन सपोर्ट सिस्टीम सह कार्यालयात जाण्यास भाग पाडले गेले, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बँकेच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर काहीही बोलण्याचे टाळले.