अरुण लाड विजयी : 30 वर्षांची मक्तेदारी मोडीत

भाजपच्या संग्राम देशमुख यांचा दारुण पराभव

टीम : ईगल आय मीडिया

गेल्या 30 वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधरांवर असलेला भाजपचा प्रभाव पुसून टाकण्यात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले असून भाजपच्या संग्राम देशमुख यांचा राष्ट्रवादी च्या अरुण लाड यांनी पहिल्या पसंती क्रमावरच तब्बल 48 हजार 824 मतांनी दणदणीत पराभव केला आहे. या विजयानंतर राज्यभरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघावर मागील 30।वर्षांपासून भाजपचा दबदबा होता. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस – राष्ट्रवादी च्या बालेकिल्ल्यात पदवीधर मतदारांवर असलेला भाजपचा प्रभाव काँग्रेस आघाडीला बोचत होता. त्यामुळे दरवेळी मोठे प्रयत्न करूनही भाजपला रोखणे काँग्रेस – राष्ट्रवादी ला शक्य होत नव्हते. मात्र यावेळी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी अरुण लाड यांच्यासाठी आग्रह धरून उमेदवारी घेतली आणि शेवटपर्यंत फिल्डिंग लावून भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला.

यावेळी मतदानासाठी पदवीधरांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार असल्याने तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. त्यामुळे मतदान मोठ्या प्रमाणात झाले.

गुरुवारी मतमोजणी ला सुरुवात झाली. पसंती क्रमाचा मतांची मोजणी केल्यानंतर 1 लाख 14 हजार 137 मतांचा कोटा विजयासाठी निश्चित केला गेला. राष्ट्रवादी चे अरुण लाड यांनी पहिल्या पसंतीची 1 लाख 22 हजार 145 मते घेऊन पहिल्या पसंती क्रमावरच आपला विजय निश्चित केला. तर भाजपच्या संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली आणि अरुण लाड यांचा 48 हजार 824 मतांनी विजय झाला. या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला असून भाजपचा प्रभाव मोडीत काढला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!