66 व्या वर्षी बोहल्यावर : जेष्ठ पत्रकारानी मोडली प्रतिज्ञा !

सोशल मीडियावर व्हायरल व्हीडिओतील लग्नाची स्टोरी

टीम : ईगल आय मीडिया

लग्न करणार नाही, असा निर्धार केलेल्या माधव पाटील या जेष्ठ पत्रकारांनी 66 व्या वर्षी कोरोना च्या एकाकीपणामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 45 वर्षीय घटस्फोटीत आणि कोरोना मुळे भावाचा आधार गमावलेल्या महिलेशी त्यांचे लग्न झाले. सध्या त्यांच्या लग्नाचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

बामन डोंगरी ( ता.उरण ) येथील जेष्ठ पत्रकार माधव पाटील हे 35 वर्षे झाले पत्रकारितेत आहेत. त्यांच्या लग्नाचा तो व्हीडिओ असून तरुणपणी त्यांचे योग्य वय होताच लग्न ठरले होते. ऐन तारुण्यात लग्नाचे स्वप्न पाहत होकार दिला, लग्न जमले, साखरपुडा ही ठरला मात्र ऐनवेळी लग्न मोडले आणि स्वाभिमान दुखावलेल्या माधव पाटील यांनी लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतली, ती वयाची 66 वर्षे होईपर्यंत पाळली सुद्धा मात्र आता या वयात त्यांनी प्रतिज्ञा मोडून संसार थाटला आहे.

कोरोना महामारी आल्यानंतर सगळेच घरात कोंडले गेले, माधव पाटील यांचे वय 66 वर्षे आणि त्यांच्या मातोश्री यांचे वय 88 वर्षे असे दोघेच वयोवृद्ध घरात असल्याने त्यांना सोबतीला कुणी तरी असावे याची जाणीव होऊ लागली आणि त्यातूनच त्यांनी आपली प्रतिज्ञा मोडली. संजना नावाच्या 45 वर्षीय महिलेसोबत त्यांनी आला नवीन संसार थाटला आहे.

पत्रकारिता, समाजकारण, राजकारण यातून आजवर समाजसेवा केलेल्या माधव पाटील यांनी आता उर्वरित आयुष्य स्वतःसाठी जगण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी या वयात लग्न केल्यानंतर होत असलेल्या हेटाळणीची त्यांनी पर्वा केलेली नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!