चिंचणी च्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

पंचायत राज मंत्रालयाने केले चिंचणी च्या वृक्षारोपण, कोविड व्यवस्थापनाचे कौतुक

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील पुनर्वसन गाव चिंचणी च्या वृक्षारोपण ,जल पुनर्भरण आणि कोविड व्यवस्थापनाची दखल पंचायत राजमंत्रालयाने घेतली असून. पंचायत राज मंत्रालयाच्या ट्विटर हँडलरवर चिंचणीचे कौतुक केले आहे आणि गावातील फोटो share केले आहेत.

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव पुनर्वसन गावठाण आहे. ओसाड माळावर वसलेल्या गावात मोठ्या कष्टाने गावकऱ्यांनी नंदनवन फुलवले असून विविध प्रकारची हजारो झाडे लावली आहेत. त्यामुळे हे गाव राज्यभरात चर्चेत आले आहे.

सध्या देशभरात कोरोना ने धुमाकूळ घातलेला असताना चिंचणी गाव मात्र कोरोना मुक्त राहिले आहे. ग्रामस्थांनी कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्याने गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. गावच्या या कार्याची दखल केंद्रीय पंचायत राज विभागाने घेतली आहे. पंचायत राज मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलरवर 3 पोस्ट केल्या आहेत आणि चिंचणी च्या कामाचे कौतुक केले आहे.

व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे शुक्रवारी पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवांनी महाराष्ट्र, गुजरात, गोवा, छत्तीसगड आदी राज्यातील मोजक्याच गावातील नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रातून हिवरेबाजार सह चिंचणी आदी 5 गावांचा समावेश होता. राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह चिंचणी चे ग्रामस्थ ही गावातूनच आदी या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये सामील होते. यावेळी चिंचणी गावाची माहिती घेऊन पंचायत राज विभागाचे सचिव चांगलेच प्रभावित झाल्याचे यावेळी दिसून आले.

शिवाय गावातील स्वच्छता, वृक्षराजी,मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, प्रशस्त आणि दुतर्फा झाडांनी बहरलेले रस्ते यांचे फोटोही share केले आहेत. गेल्या काही दिवसापासून चिंचणी हे गाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जात असून गावाने केलेल्या या प्रयत्नांची दखल केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने घेतली असल्याने ग्रामस्थांनी ही समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!