कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 4 जनांचा मृत्यू

पांढरेवाडी (ता.पंढरपूर ) येथील पिंपरकर कुटुंबावर किरोनाचा घाला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पांढरेवाडी ( ता पंढरपूर ) येथील पिंपरकर कुटुंबावर कोरोनाने घाला घातल्याने केवळ 17 दिवसांत एकाच घरातील 4 जणांचा बळी गेला आहे. कुटुंबातील एका विवाहित बहिणीचा ही मे महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरकर कुटुंबासह पांढरेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.


पांढरेवाडी येथील पिंपरकर कुटुंब शेती आणि व्यवसाय करून आनंदाने जीवन चरीतार्थ चालवत होते. जांबुवंत पिंपरकर हे कुटुंबियातील कर्ता होते. जांबुवंत यांच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि विवाहित बहिणी असा परिवार सुखसंपन्न आहे.

मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जांबुवंत यांची सुरवड (ता. इंदापूर ) येथे दिलेली बहीण सुवर्णा बनसुडे कोरोना बाधित झाल्या. त्यांचा 6 मे रोजी मृत्यू झाला. दरम्यान जांबुवंत यांनाही कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने 10 मे रोजी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर एक – एक करीत सर्व पिंपरकर कुटुंब कोरोना बाधित निघाले. उपचारासाठीत्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जांबुवंत यांच्या पत्नी आणि मुलांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले.

या कालावधीतच जांबुवंत यांचे चुलते पोपट पिंपरकर यांचे 31 मे रोजी कोरोनाने निधन झाले. त्यानंतर जांबुवंत यांची आई चिंगाबाई पिंपरकर यांचा 9 जून रोजी कोरोनाने मृत्यू झाला. तर पत्नी चिंगाबाईच्या पाचव्या दिवशी जांबुवंतचे वडील बजरंग पिंपरकर यांच्यावर कोरोनाचा आघात झाला. आणि वडिलांचा तिसऱ्या दिवशीच जांबुवंत पिंपरकर ( वय 39 वर्षे ) यांच्यावरही कोरोनाने घाला घातला.

बघता – बघता होत्याच नव्हतं झालं आणि अवघ्या 17 दिवसांत घरातील 4 माणसे मृत्युमुखी पडल्याने कुटुंब कोरोनाने उध्वस्त झाले.
पिंपरकर कुटुंबियांची कोरोनाने विदारक परिस्थिती झाली असून कुटुंबातील बहिणीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील चार व्यक्ती मरण पावल्या परंतु चार जणांपैकी कोणाचा मृत्यू झाला आणि कोणी कोरोनाशी दोन हात करून जिवंत राहिले याची कोणालाही जाणीव होऊ शकली नाही. जांबुवंत यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे

Leave a Reply

error: Content is protected !!