राजस्थानात ‘एक फुल दोन माळी’ : रेल्वेखाली जीव दिला एकाच वेळी

बातमी सोबत वापरण्यात आलेले चित्र प्रतिकात्मक आहे. चित्रकार : सुनील चावडीकर

टीम : ईगल आय मीडिया

‘ ते ‘ दोघेही सख्खे चुलत भाऊ होते. दोघांच्याही हातावर एकाच मुलीचे नाव लिहिलेले होते. रविवारी रात्री उशिरा दोघा भावांनी ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. राजस्थानमधील बूंदी जिल्ह्यातील केशवरायपाटन येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी त्यांचे मृतदेह रेल्वे रुळांवर आढळले.

दोघेही मूळचे दबलाना हद्दीतील केशवपुरा गावातील रहिवासी होते. दोघांच्या हातावर एकाच मुलीचे नाव होते. यावरून असे दिसते की, या दोघांचे एकाच मुलीवर प्रेम होते. कोणत्या तरी गोष्टीवरून दोघांमध्ये वाद किंवा काहीतरी घडले की दोघांनी एकाचवेळी आत्महत्या केली. मृतांजवळील मोबाइल फोनवरूनच त्यांची ओळख पटली.

गुडलाजवळ दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांवर दोघांचेही मृतदेह आढळून आले. रुळांनजीक त्यांची दुचाकी सापडली असून दोघेही तरुण दुचाकीवरून या ठिकाणी आले. त्यांनी एकाचवेळी ट्रेनखाली आत्महत्या केली. दोघेही सख्खे चुलत भाऊ होते. एक जण बूंदी येथे शिक्षण घेत होता. तर दुसरा त्याच्यासोबत राहत होता. तो नोकरी करत होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सांगितले की, प्रेम प्रकरणातून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. दोघेही एकाच मुलीवर प्रेम करत होते. अशी प्राथमिक माहिती असून या घटनेची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी नातेवाइकांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!