दर्शन मंडप आणि स्काय वॉकसाठी तयार 110 कोटीच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीची मान्यता

2 वर्षापासून प्रलंबित प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी

पंढरपूर : eagle eye news


येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी दर्शन मंडप व स्काय वॉक उभा करण्यासाठी तयार करण्यात आलेला ११० कोटी रुपयांचा आराखडा उच्च अधिकार समितीने मंजूर केलेला आहे. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या आराखड्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी यात्रेनंतर वेगवान पाठपुरावा केला आहे. शुक्रवार दि. १६ ऑगस रोजी राज्याच्या मुख्य सचिव सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीच्या बैठकीतहा आराखडा समितीने मंजूर केलेला आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक जिल्हा नियोजन अधकारी पुंडलिक गोडसे उपस्थित होते.


नुकतीच आषाढी यात्रा संपन्न झाली, यावेळी २० लाखांवर भाविकांची गर्दी झाली होती, दर्शन रांगेतील भाविकांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी तिरुपती बालाजी दर्शन व्यवस्थेच्या धर्तीवर विठ्ठल दर्शनासाठी टोकन दर्शन पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यासाठी आवश्यक दर्शन मंडप आणि दर्शन रांगेतील स्काय वॉक चा आराखडा दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यात्रा झाल्यानंतर या आराखड्याचा पाठपुरावा युद्धपातळीवर केला.

जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानंतर दिनांक १६ ऑगस्ट रोजी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधकार समितीने आराखडा सविस्तरपणे पाहून मान्यता दिली आहे. यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीकडे हा आराखडा सादर केला जाईल. पुढील सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत राज्य शिखर समितीचे बैठक होऊन दर्शन मंडप व स्काय वॉक आराखड्यास अंतिम मान्यता मिळेल व त्यानंतर लवकरच शासन निर्णय निघेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!