शेतकरी आंदोलन हिंसाचार ; अभिनेता दीप सिद्धूने चिथावल्याचा आरोप

दीप सिद्धू चे भाजप कनेक्शन उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डाव्या बाजूला उभा असलेला अभिनेता दीप सिद्धू दिल्ली हिंसाचार प्रकरणी संशयाच्या फेऱ्यात आहे.

टीम : ईगल आय मीडिया

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यान पोलिस आणि शेतकरी यांच्यात बर्‍याच ठिकाणी धुमश्चक्री उडाली. 86 पोलीस या धुमश्चक्रीत जखमी झाले. हजारो लोकांनी लाल किल्ल्यावर चढाई करून राष्ट्ध्वजाचा अवमान केला. या प्रकरणी जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप भाजपशी कनेक्शन असलेला आणि अभिनेता सनी देओल समर्थक पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यावर केला जात आहे.

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू  याचं नाव पुढे येत आहे. दीप सिद्धूने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावलं, असा आरोप शेतकरी नेते करत आहेत. दीप सिद्धूने आंदोलकांना चिथावलं आणि त्यांची दिशाभूल केली, असा आरोप भारतीय किसान युनियन हरयाणाचे प्रमुख गुरनामसिंग चधुनी यांनी केला.

1984 साली मुक्तसर जिल्ह्यात जन्मलेला अभिनेता दीप सिद्धू पेशाने वकील होता. मात्र त्याने 2015 साली वकिली सोडली आणि चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला.2015 साली आलेला त्याचा ‘रमता जोगी’ हा पहिला चित्रपट होय.मात्र ती फारसा चालला नाही. 2018 आलेला ‘जोरा दस नंबरी’ हा चित्रपट सिद्धू ला स्टार बनवून गेला. यामध्ये त्याने गँगस्टर ची भूमिका केली होती. 2020 च्या मार्चमध्ये त्याच्या ‘जोरा दस नंबरी’ चा सिक्वेल आला मात्र तो कोरोना लॉकडाऊन मुळे डब्यात गेला. 2019 च्या गुरुदासपूर लोकसभा निवडणुकीत दीप सिद्धू हा अभिनेता सनी देओल साठी काम करीत होता. त्याच्या माध्यमातून त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट झालेली होती. गेल्या काही दिवसापासून तो किसान आंदोलनात सहभागी होता, त्याचे भाषणे भिंद्रांवले यांची भाषा बोलणारी होती. त्यामुळे त्याला आंदोलनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न शेत5 आंदोलकांनी केला होता. तरीही दीप सिद्धू आंदोलनात सहभागी होत होता आणि पहिल्या पासून त्याची भाषणे चिथावणीखोर होती.

दीप सिद्धूनेच आंदोलकांना लाल किल्ल्यावर नेले. शेतकरी तिथे जाण्याच्या बाजूने कधीच नव्हते. गुरनामसिंग चधुनी यांच्यासह स्वराज पक्षाचे योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू यावर आरोप केला आहे. दीप सिद्धू अनेक दिवसांपासून आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत होता. तो भाजपशी संबंधित आहे, असा आरोप यादव यांनी केला.

दीप सिद्धू हा निवडणुकीत भाजप खासदार सनी देओल एजंट होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याचे बरेच फोटो आहेत. याबाबत आम्ही दिल्ली पोलिसांना बर्‍याचदा सांगितलं होतं. पण कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचे फोटो समोर येऊनही त्याला अटक करण्यात आलेली नाही. यामुळे दिल्लीच्या हिंसाचारामागे षडयंत्र असण्याची शक्यता आहे, असं योगेंद्र यादव म्हणाले.

दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या अटींसह ट्रॅक्टर परेड घेण्यास परवानगी दिली होती. पण मंगळवारी सकाळी शेतकरी ट्रॅक्टरसह दिल्लीच्या हद्दीत घुसले आणि त्यांनी सर्व नियम मोडले. आंदोलकांनी बेरीकेडिंगची जोरदार तोडफोड केली. आयटीओवरून सर्वप्रथम आंदोलन करणारे शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यानंतर, आंदोलकांनी पोलिसांना चकवा देत लाल किल्ल्यात प्रवेश केला. तिथे त्यांनी झेंडा फडकवला.

कॉंग्रेसचे लोकसभेचे खासदार रवनीतसिंग बिट्टू यांनीही असाच दावा केला आहे. दीप सिद्धू यानेच लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला. सिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या संघटनेचा तो सदस्य आहे. घटनेनंतर दीप सिद्धूने फेसबुक लाइव्ह केलं. आम्ही केवळ लाल किल्ल्यावर ‘निशान साहिब’ (झेंडा) फडकावला आहे. आणि विरोध करणं हा आमचा हक्क आहे. आम्ही तिरंगा काढला नाही, असं तो दीप सिद्धू म्हणाला.

दीप सिद्धू आणि त्याचा भाऊ मनदीप यांना एनआयएने चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं होतं. दीप सिद्धू हा शेतकरी आंदोलनात सहभागी आहे आणि शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. शीख फॉर जस्टिस या फुटीरतावादी संघटनेविरोधात दाखल केलेल्या खटल्या प्रकरणी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही भावांची चौकशी केली होती.

Leave a Reply

error: Content is protected !!