पूरग्रस्त कुटुंबांना जेवण ; जनावरांसाठी कडबा वाटप !

मोहोळचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांचा आष्टे – कोळेगाव येथे उपक्रम

मोहोळ : ईगल आय मीडिया
नैसर्गिक आपत्तीच्या काळात संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदत करणं ही एक माणुसकीची भावना असून शिवाय ते एक कर्तव्य देखील आहे.प्रत्येकाने आपापल्या परीने अशा पूरग्रस्त कुटुंबांना मदत करायला हवी. अचानक आलेल्या पावसामुळे महापुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून शासन स्तरावरून अशा पूरग्रस्तांना तातडीने मदत म्हणुन जीवनावश्यक वस्तू आणि धान्य देण्यात यावे. अशी मागणी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड यांनी केली.

आष्टे -कोळेगाव लगत असलेल्या देशमुख वस्ती मधील दहा ते बारा कुटुंबाच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने जीवनावश्यक वस्तू तर बुडाल्याच मात्र धान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनावरांसाठी ठेवलेला कडबा व इतर चारा वाहून गेला. उघड्यावर संसार आलेल्या देशमुख वस्ती वरील दहा ते बारा कुटुंबांना माणुसकीच्या भावनेने मदत म्हणून मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड यांच्या संकल्पनेतून गायकवाड परिवाराच्यावतीने नागरिकांच्या जेवणाची सोय करण्यात आली.

या भागात हा उपक्रम सर्वप्रथम गायकवाड यांनीच राबवला. हा उपक्रम राबवल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासकीय स्तरावरून अशा गरजू पूरग्रस्तांना त्वरित मदत देण्याची मागणी केली.
यावेळी गायकवाड यांनी ७०० पेेंड्या कडबा देखील जनावरांसाठी चारा म्हणून उपलब्ध करून दिला. नैसर्गिक आपत्ती पुढे कोणाचे तरी काय चालणार ?मात्र अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना माणुसकीच्या भावनेने एक मदत म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी बाळासाहेब गायकवाड यांचे बंधू विष्णुपंत ज्ञानदेव गायकवाड, उद्योजक प्रभाकर तथा दादा डोके, पुष्कराज पाटील, शिवाजीराव साळुंखे, दिलीप देशमुख, सज्जन देशमुख यांच्यासह या परिसरातील पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते. गायकवाड परिवाराने राबवलेल्या या आदर्शवत उपक्रमाची गरज इतर ठिकाणीही असून प्रत्येकाने आपापल्या परीने पूरग्रस्तांना मदत करायला हवी.

Leave a Reply

error: Content is protected !!