.
पर्यटन विभागाने लक्ष दिल्यास मिळेल पर्यटनास चालना
अकलूज : ईगल आय मीडिया
येथून अगदी जवळ असलेल्या गिरझनी ( ता. माळशिरस ) येथील तलाव सध्या भरला असून सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे. याच सांडव्याखाली असलेल्या नैसर्गिक उंचीमुळे निर्माण झालेला धबधबा, सध्या माळशिरस तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. सहकार नगरी अकलूज गेल्या 10 वर्षात पर्यटन नगरी बनले असून येथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गिरझनी तलाव धबधब्याचा आणखी विकास केला तर जिल्ह्यात आणखी एक पर्यटन स्थळ विकसित होणार आहे.
गिरझणी तलावाचा धबधबा हा भविष्यत पर्यटनास चालना देणार ठरु शकेल,याकरीता पर्यटन विभागाने याकडे लक्ष देवुन तलावाचा परीसर विकसित करणे अवश्यक आहे.
१९८४ साली या तलावाच्या कामाला सुरुवात झाली व सन १९९१ साली तलावाचे काम पुर्ण झाल्यानंतर १९९१ च्या पावसाळ्यात या तलावात पाणी अडवण्यास सुरुवात केली. गेल्या २९ वर्षात जुन महिन्यात पावसाच्या पाण्याने तलाव भरण्याची ही पहीलीच वेळ आहे. २५ जुनच्या पावसानंतर हा तलाव भरुन ओव्हर फ्लो होऊन सांडव्यातुन सुमारे ८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. हा तलाव प्रामुख्याने गिरझणी, पाणिव, बागेवाडी, गावच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरत आहे. तर या तलावामुळे यशवंतनगर,चौंडेश्वरवाडी पारीसरातील विहीरी व बोआरवेलच्या पाझरास फायदा होत आहे. तलावाच्या निर्मिती पासून आत्तापर्यत एखदा तलावाची उंची १ मिटरने वाढवण्यात आली आहे मात्र तलावात गेल्या २९ वर्षीत पाण्याबरोबर आलेल्या मातीने तलावात भरपुर गाळ साठला असल्याने पाणी साठवण क्षमताही कमी होत आहे. शिवाय बंधाऱ्याचा औटलेट दरवाजास गळती असल्याने पाणी गळती कायम सुरु असते.अनेकदा पाऊस न पडल्यास बंधारा कोरडा पडत असतो. परीसरासाठी वरदान असलेल्या गिरझणी तलावाकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देवुन दुरुस्ती व विकसित कामांना गती देण्याची मागणी परीसरातील नागरीकांच्या कडून होत आहे.
पर्यटकांची मागणी
गिरझणी तलावाखालील नर्सगिक धबधबा माळशिरस तालुक्याच्या पर्यटनात भर घालणारा ठरणार असून,पर्यटन विभागाने या परीसराचा विकास करुन पर्यटन स्थळ म्हणुन घोषीत करण्याची मागणी येणारे पर्यटक करत आहेत.
ग्रामस्थांचे अहवान
हा नर्सगिक धबधबा पाहण्यासाठी होणारी गर्दी धोकादायक ठरु शकते.गिरझणी तलावाकडे नागरीकांनी गर्दी करु नये स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेततेची काळजी घ्यावी असे अहवान ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या पर्यटकांना केले जात आहे.