पंढरपूर : eagle eye news
गुंजेगाव ( ता. मंगळवेढा ) येथील शेकडो कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील गटात प्रवेश केला आहे, यामुळे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला बळ मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या सोबत उभा राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अभिजीत पाटलांच्या मागे शक्ती उभी करा,असे आवाहन मंगळवेढा येथे शरद पवारांना केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघात कार्यकर्ते अभिजित पाटील यांच्यासोबत उभा राहतअसल्याचे दिसून येत आहे.
गुंजेगाव तालुका मंगळवेढा येथील डॉ.प्रशांत कांबळे,बालाजी मेटकरी, दत्ता ढोणे, विष्णू नरळे, शंकर चौगुले, सिताराम सातपुते, भारत माने, परमेश्वर डुम, निलेश माने, सिद्धेश्वर डूम, मारुती चौगुले, अनिल चौगुले, रोहित लंगोटे, दादा लंगोटे, अंकुश जगदने, ज्ञानेश्वर कुदळे, नवनाथ बुडबुडे, राजू कांबळे, दिगंबर पवार, आत्मा कांबळे, दत्ता बालगिरे, सुरेश पाटील, पप्पू कांबळे, पप्पू पाटील, नागू चौगुले, नंदू चौगुले, तुकाराम चौगुले, सोमनाथ डुम, प्रकाश सुतार, सागर चौगुले, अमर सुतार, तुकाराम कांबळे, भारत ढोबळे, अनिल ननवरे, ज्ञानेश्वर मेटकरी, सचिन चौगुले, नंदू मिटकरी, राजू कोरे, किसन कांबळे, विलास ढोणे, सोमनाथ काळे, सौदागर कुदळे आदी मान्यवरांनी अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाटील गटात प्रवेश केला आहे.
यावेळी मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, अंधळगावचे सरपंच लहुजी लेंडवे, सचिन वाघाटे, रमेश इंगोले, पांडुरंग कोष्टी, दशरथ जाधव, हणमंत क्षीरसागर, डाॅ. राजेंद्र यादव, काकासाहेब मोरे, अजिंक्य बेदरे, विठ्ठल ढगे, पप्पू भोसले, राहूल मेटकरी यासह आदी मान्यवर उपस्थित होते.