कोरोना ‘स्ट्रेन’चा नामकरण सोहळा

ही’ आहेत भारतातील दोन्ही स्ट्रेन ची नांवे

टीम : ईगल आय मीडिया

जगभरात कोरोना विषाणू ने धुमाकूळ घातला असून त्याच्याशी दोन हात करता-करताच आता कोरोना विषाणू चे नामकरण ही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भारतात आढळलेल्या दोन कोरोना स्ट्रेन चेही नामकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत भारतात करोनाचे दोन स्ट्रेन आढळून आलेल आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये भारतात आढळून आलेल्या B.1.617.2 या स्ट्रेनला ‘डेल्टा’ असं नाव देण्यात आलं आहे. तर मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आढळून आलेल्या B.1.617.1 या स्ट्रेनला ‘कप्पा’ असं नाव देण्यात आलं आहे.

जगभरात करोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले आहे. करोनाच्या विषाणूमध्ये बदल झाल्याने हे स्ट्रेन निर्माण झाले असून, त्याच्या नावांवरून गोंधळ निर्माण होऊन, वादही होत आहे. या सगळ्या गोंधळावर जागतिक आरोग्य संघटनेनं मार्ग काढला असून, विविध देशात आढळून आलेल्या करोना स्ट्रेनचं नामकरण केलं आहे. भारतात आढळून आलेल्या दोन स्ट्रेनना ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ अशी नावं देण्यात आली आहेत.

ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, अमेरिका, भारत या देशात म्युटेशन होऊन करोनाचे नवीन स्ट्रेन निर्माण झाले आहेत. ब्रिटनमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये आढळून आलेल्या B.1.1.7या स्ट्रेनचं नाव ‘अल्फा’ असं ठेवण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत B.1.351 करोनाचा स्ट्रेन आढळून आला होता. तो आता ‘ बेटा ‘ या नावाने ओळखला जाणार आहे. तर ब्राझीलमध्ये या वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे जानेवारीमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनला ‘गामा’ असं नाव देण्यात आलं आहे. अमेरिकेतील स्ट्रेनला ‘एप्सिलॉन’ तर फिलीपाईन्समध्ये जानेवारी महिन्यात आढळून आलेल्या करोना स्ट्रेनचं नाव ‘थीटा’ असं ठेवण्यात आलं आहे.

करोनाचे नवीन स्ट्रेन निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नावावरून वाद सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वीच डबल म्युटेंशन असलेल्या B.1.617.2 स्ट्रेनचा भारतीय स्ट्रेन असा उल्लेख काढण्याचे आदेश केंद्र सरकारने सोशल मीडियाला दिले होते. तर सिंगापूर सरकारनंही सिंगापूरमध्ये आढळून आलेलं नवीन म्युटेशन भारतातीलच असल्याचं म्हटलं होतं. या वादावर मार्ग काढत जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशात आढळून आलेल्या स्ट्रेनला नाव दिली आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!