बिनविरोध झालेली पंढरपूर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्य शासनाच्या सर्वच अभियानात सहभाग घेऊन जवळपास सर्व पुरस्कार पटकावणारी तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत असलेल्या जैनवाडी ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होत आहे. गावपातळीवर सर्व गटांनी मिळून एकत्र बसून बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
72 ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यात बिनविरोध होणारी जैनवाडी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
जैनवाडी ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या गावच्या मागील निवडणुका चुरशीच्या झाल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
ग्राम स्वच्छता अभियान ते तंटामुक्त ग्राम अभियान, स्वछ भारत अभियान असो की पर्यावरण समृद्ध ग्राम अभियान असो, शासनाच्या सर्वच अभियानात सहभाग घेऊन जैनवाडी ग्रामस्थांनी पुरस्कार पटकावले आहेत. या निमित्ताने ग्रामस्थांनी निवडणुकीनंतर आपला एकोपा वेळोवेळी सिद्ध केलेला आहे. याच एकोप्याने यावेळची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय गावातील सर्वच युवकांनी घेतला.
त्यानुसार बैठक होऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले आहे. उमेदवारी अर्जही ठरल्यानुसार दाखल केले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी निवडणूक बिनविरोध झाल्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार यांच्यासह विजय साळवे , आप्पासो दानोळे, किरण दानोळे, अशोक मिरजे, हणमंत सोनवले, हणमंत कलागते, सुनिल शिंगटे, गजेंद्र देसाई, अमित खाणे, राहुल हातगिणे , संजय गोफणे,भारत गोफणे, आण्णासो दानोळे, सुनिल वठारे, मोहन लिंगडे , हिम्मत हसुरे, महादेव लिंगडे, किरण सदलगे, बाबासो शिंगटे, अशोक सदलगे, हणमंत लिंगडे, बंडु लिंगडे, विलास गोफणे, मच्छिंद्र गोफणे, अनिल शिंदे, नेताजी गोफणे,
मोहन माने, पवन मोरे, बिभीषण पवार, कृष्णा पवार, प्रकाश शिंगटे, कुमार शिंगटे, दत्तात्रय सुतार, बाळासो जमदाडे, सचिन गोफणे, समाधान पवार, सचिन वाखरे, विशाल गोफणे, हिम्मत लिंगडे, जालिंदर गोफणे, रोहीत मेंढेगिरी, मानाजी पवार, सुनिल पवार, शिवाजी शिंगटे, आप्पासो शिंगटे, कुलभुषण ऊदगावे, प्रल्हाद देवकर, सुकुमार मिरजे, विनायक लिंगडे, हणमंत गुजर, रमेश पाटील, बलभिम होनमाने, निरज पवार, नंदकुमार मोरे, संजय मोरे, बाळासो वाघमारे, राजकुमार उमडाळे, प्रशांत भोसेकर, हणमंत सुरपुसे, राजेंद्र पवार, जोतिराम देवकर आदींनी ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले.
या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत बिनविरोध होणारी जैनवाडी पहिली ग्रामपंचायत पहिली निवडणूक ठरली आहे. निवडणूक बिनविरोध झाल्याने ग्रामस्थानीही समाधान व्यक्त केले आहे.