Jee exam : 99 टक्के गुण मिळवूनही समाधान नव्हते !

4 वेळा परीक्षा दिली, शेवटी 100 टक्के गुण मिळवलेच

टीम : ईगल आय मीडिया

भटिंडा येथील अठरा वर्षीय पुलकित गोयल याने 100 टक्के गुण मिळवून देशात पहिल्या क्रमांकाने जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) मुख्य परीक्षा पास झाला आहे. विशेष म्हणजे 100 टक्के गुण मिळवण्यासाठी पुलकित ने 4 वेळा jee परीक्षा दिली आहे. Jee चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

2003 साली पंजाबमध्ये जन्मलेल्या पुलकित ने jee ची परीक्षा 4 वेळा दिली आहे. आश्चर्य म्हणजे पहिल्या वेळी त्याने 99 टक्के मार्क्स मिळवले. तरीही त्याचे समाधान झाले नाही. 300 पैकी 300 गुण मिळवण्यासाठी त्याने पुन्हा परीक्षा दिली. दुसऱ्या वेळी त्याला 99.88 टक्के गुण मिळाले, त्यानंतर ही समाधान झाले नाही, तिसऱ्या वेळी त्याला चक्क 99.99 टक्के मार्क्स मिळाले. 100 टक्के गुण मिळवण्याचे त्याच्या डोक्यावरचे भूत काही उतरत नव्हते. चौथ्या वेळी तो jee मेन्स ला बसला आणि यावेळी त्याने स्वप्न पूर्ण केले. 100 टक्के गुण मिळवत त्याने देशातील पहिल्या क्रमांकवरील 18 जणांमध्ये स्थान मिळविले.


‘कोविड च्या निर्बंधांनी मला माझ्या खाजगी शिकवणी संस्थेद्वारे व्हर्च्युअल क्लासेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरेसा वेळ दिला. मी दररोज 7-8 तास कोचिंग आणि नियमित क्लासेसच्या अभ्यासासाठी ऑनलाईन खर्च करत होतो, गणित हा माझा सर्वात आवडता विषय आहे आणि संगणक अभियंता होण्याचा माझा मानस आहे. जेईई मेन 2021 फेब्रुवारी सत्रात, मी 99.88 टक्के गुण मिळवले पण मी गुणांवर समाधानी नाही. मी आणखी दोन प्रयत्न केले आणि 99.99 गुण मिळवले पण शेवटी 100 गुण मिळवण्यात यशस्वी झालो. मला त्याचा आत्मविश्वास होता,


पुलकित गोयल संत नामदेव रोड परिसरात राहतो,त्याचे वडील व्यापारी आहेत आणि आई नीलम गृहिणी आहेत. तर त्याची मोठी बहीण संगणक अभियंता आहे. गोयल यांनी 12 वी मध्ये 98.60 तर इयत्ता 10 मध्ये 94.80 टक्के गुण मिळवले होते. आपल्या यशाचे श्रेय पुलकितने शिक्षक आणि कुटुंबाला दिले असून ज्याने त्याला सर्व समर्पण, कठोर परिश्रम आणि परीक्षेत उत्कृष्ट होण्यासाठी चिकाटीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त केले.

Leave a Reply

error: Content is protected !!