कोरोनाचा खतरा : आणि पॉझिटिव्ह जुगारी 17

लक्ष्मी दहिवडीत जुगार खेळणाऱ्या 17 जणांसह 21 जण पॉझिटिव्ह

टीम : ईगल आय मीडिया

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडीमध्ये जुगार खेळणाऱ्या १७ जणांना कोरोणाची लागण झाली असून त्यांच्या कुटुंबासह २१ जणांचे रिपोर्ट पिझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासह गावात एकूण रुग्ण २६ झाले आहेत. शाळेत विलगीकरण केलेल्या त्या जुगाऱ्यानी मंगळवेढ्याच्या कोव्हिड सेंटर मध्ये जाण्यास नकार दिला असून प्रशासनाशी हुज्जतही घातली. संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या टेस्ट करायचा नाहीत असा हट्ट धरत ‘हाय रिस्क,लो रिस्क’संपर्कातील लोकांची नावे देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे आमचे खोटे रिपोर्ट प्रशासनाने दिल्याचा आरोप केला.
गावाध्ये जुगार,दारू विक्री असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत आहेत, लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात या अवैध धंद्यावर पोलिसांनी निर्बंध आणले नाहीत. गावात पत्याचे क्लब सुरू असून शेजारील गावातून जुगारी या ठिकाणी पत्ते खेळण्यास येत असतात. त्या गावातीलही एकजण पॉझिटिव्ह आला आहे या पत्ते खेळणाऱ्या ग्रुपमधील एकाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ग्राम समितीने सर्वांचे गावातील शाळेत विलगीकरण करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचीही घेऊन टेस्ट करण्यात आले असता त्या सर्वांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोणाची लागण होऊ शकते यासाठी प्रशासनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टेस्ट करण्यासाठी नियोजन केले, मात्र त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या टेस्ट करण्यास स्पष्ट नकार दिला.
त्यामुळे लक्ष्मी दहिवडी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित रुग्णांच्या कुटुंबांच्या कोरोना टेस्ट घेण्यास आरोग्य प्रशासनही हतबल झाले आहे.
या अगोदर गावात सहा रुग्ण सापडले होते, अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांनीही दुकान उघडत गावात धान्य वाटप केले आहे. त्यामध्ये एक दुकानदारही पॉझिटिव आला आहे. त्या दुकानदाराने अनेक लोकांना रेशनचे धान्य वाटप केल्याची चर्चा असून गावात आहे.

त्यामुळे सर्वांची तपासणी केली तर गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

One thought on “कोरोनाचा खतरा : आणि पॉझिटिव्ह जुगारी 17

  1. धक्कादायक बाब असून वेळीच काळजी घेण्याची गरज लक्ष्मी दहिवडी करांना आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!