390 पॉझिटिव्ह : अकलूज शंभरीच्या उंबरठ्यावर
माळशिरस : ईगल आय मीडिया
माळशिरस तालुक्यात कोरोना चांगलेच हात पाय पसरत असून बघता-बघता तालुक्यातील 37 गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. एकूण 390 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि त्यापैकी 5 जण मयत झाले आहेत. उपचारानंतर बरे होऊन घरी 146 रुग्ण सोडले असले अजूनही 239 वर उपचार सुरु आहेत.
माळशिरस तालुक्यातील
कोवीङ पाॕझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या अकलूजकरांसह तालुका प्रशासनास ङोकेदुखी ठरु लागली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन भरपूर प्रयत्न करत आहे. तरीही अकलूजमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे.
अकलूज शहरात दि.8 अखेर कोरोना रुग्णांची संख्या 97 झाली आहे. तर आजपर्यंत माळशिरस तालुक्यातील गावात कोरोना घुसला असून यशवंतनगर 25, वेळापुर 34, विझोरी 21, श्रीपुर 6, माळशीरस 7, बोरगाव 14, संग्रामनगर 19, उघङेवाङी 2, माळीनगर 26, एकशिव 3,कोंडभावी 1, माळेवाडी ४, शिंदेवाडी 5, निमगांव १,सदाशिवनगर १३, नातेपुते १७, गुरसाळे २, फळवणी २, मांडवे ४, गिरवी १, महाळुंग 24, वाफेगांव 5, लवंग 13, उंबरे वेळापूर २, सवतगव्हाण 14, धर्पूमरी 4, माळखांबी 9, फोंडशिरस २, दहीगांव १, खंडाळी 3, चाकोरे १, तांदुळवाङी १ माळेवाडी 4 गिरझणी 1कन्हेर 2 नेवरे 5 अशी 390 रुग्ण संख्या झाली आहे.
390 पैकी 146 रुग्णांना उपचाराअंती घरी सोङण्यात आले तर 239 रुग्ण अद्यापी उपचार घेत आहेत.
दि. 8 आॕगस्ट अखेर उपचार घेताना 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अकलूज येथील दवाखान्यांत कोरोनावर उपचार घेणाऱ्या सांगोला व पंढरपुर तालुक्यातील २ व्यक्तींचा मृत्यु झाला आहे.
ग्रामीण पातळीवर स्थानिक ग्रामपंचायत कोणतेही गंभीरपणे दखल घेत नसल्याने आजार बळावतो. ठोस पावले उचलली जात नाहीत पोलिस यंत्रणा व आरोग्य विभाग सज्ज असुन ग्रामपंचायतचे ठिसाळ नियोजन दिसुन येत आहे.