भर समुद्रात तौक्ते वादळाशी 14 तासांचा संघर्ष

मंगळवेढ्यातील युवकाने समुद्रात तौक्ती वादळावर केली केली मात

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

मुंबईला नोकरीसाठी गेलेला, खुपसंगी ( ता.मंगळवेढा ) येथील युवक मुंबईत आलेल्या तोक्तै चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडला. भर समुद्रात 14 तास जीवन मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर नौदलाने त्यांची सुखरूप सुटका केली. दरम्यान, विश्वजित सुखरूप असल्याचे समजताच गावाकडे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या त्याची पत्नी, भाऊ, आई,वडील यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

खुपसंगी येथील विश्वजीत बंडगर हा गावातील बेरोजगारीला कंटाळून 25 नोव्हेंबरला मुंबईला नोकरीच्या निमित्ताने गेला. तिथे मेथो असोसिएशन या कंपनी काम करत असताना तो समुद्रामध्ये बार्ज मधून त्याच्या इतर साथीदारासोबत गेला. तत्पूर्वी शासनाने याबाबत धोक्याचा इशारा दिला असताना या कंपनीने दुर्लक्ष केले. समुद्रातील इतर बार्ज निघून गेल्या. मागे राहिलेली बार्ज तोक्ते वादळाच्या तडाख्यात सापडली.

15 मिटरपेक्षा अधिक मोठ्या लाट्यामुळे घबराट पसरली. संरक्षक जॅकेट घालून सर्वांनी पाण्यात उड्या मारल्या आणि तब्बल साडे चौदा तास पाण्यात जगण्यासाठी संघर्ष करत होते. त्यासोबत असलेले इतर सहकारी या वादळाच्या तडाख्यात इतरत्र वाहून गेले. मात्र स्वतःला वाचवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

टायटॅनिकचा थरारक अनुभव घेतला, नौदल देवासमान धावून आले !

समुद्रात बुडणाऱ्या टायटॅनिक चित्रपटातील चित्तथरारक अनुभव आम्ही स्वतःहा घेतला. संपर्क होत नसल्यामुळे गावाकडील लोक रडत होते. ते मुंबईला येण्यासाठी निघाले होते ज्यावेळी आमचा फोन केला त्यामुळे त्यांना आम्ही सुखरूप असल्याचे सांगितल्यावर समाधान वाटले.या संकटातून आम्ही वाचलो ते इंडियन नेव्ही मुळे तेच आमच्या साठी देव आहे.
विश्वजीत बंडगर, खुपसंगी

जोपर्यंत मदतीला कोणी येत नाही तोपर्यंत आपण वाचू शकणार नाही असे समजून इतर सहकाऱ्यांनी एकमेकाला धीर देत साडे चौदा तास पाण्यात काढले. मोबाईल देखील पाण्यात भिजून बंद पडल्यामुळे त्यांना घरच्यांशी संपर्क होईना अशा परिस्थितीत घरातील वातावरण दुःखमय झाले होते. पाण्यात जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतानाच शेवटी हवाई दलाचे विमान ज्या वेळेला त्यांच्या समोर दिसले, त्यावेळी त्यांनी त्यांच्या जीवात जीव आला. आणि नौदलाने सोडलेल्या दोरीच्या साह्याने ते तरुण सहकारी सुखरूप परतले. या संघर्षामध्ये त्याच्या डोक्याला किरकोळ मार लागला असून, समुद्रातील क्षारयुक्त पाणी कानात गेल्यामुळे ऐकण्यासाठी त्रास होत आहे.

रविवारी संध्याकाळ नंतर कुटुंबाशी त्याचा संपर्क पूर्णपणे तुटला होता, त्यामुळे घरच्यांनी मुंबईला जाण्याची तयारी केली. मात्र मुंबईवरून आपण सुखरूप असल्याचा फोन आल्यामुळे घरच्यांचा चेहऱ्यावर हास्य उमटले.

Leave a Reply

error: Content is protected !!