नवऱ्यासह वरबाप आणि भाऊ – भावजय कोरोना ग्रस्त

लग्नाला गेलेल्या वऱ्हाडी मंडळींची उडाली झोप

टीम : ईगल आय मीडिया

मोठ्या दणक्यात लग्न झाल्यानंतर थेट नवरदेव, नवरदेवाचे वडिल, नवरदेवाचे भाऊ – भावजय कोरोना बाधित झाले आहेत. यामुळे आता जळगाव प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तर वऱ्हाडी मंडळींची आपणही कोरोना बाधित होणार नाही ना ? या चिंतेने हवालदिल झाली आहेत.  राज्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असतानाच जळगाव तालुक्यातील या लग्नाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.

16 फेब्रुवारीला विवाह सोहळा आटोपल्यानंतर नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांना कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या लग्नातील नवरदेवच कोरोनाग्रस्त  आढळल्याने संपूर्ण वऱ्हाडी मंडळींची चिंता वाढली आहे. आपण तर कोरोना पॉझिटिव्ह येत नाही ना? अशी भीती लग्नाला आलेल्या प्रत्येकाला वाटू लागली आहे.

शिरसोली ( ता.जि. जळगाव ) गावात विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह त्याचे वडील, भाऊ, भावजयी आणि अन्य एक जण असे पाच जण कोरोना बाधित निघाले आहेत. शिरसोली गावात दोन दिवसात सात बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.


कोरोनाने बाधित असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. तसंच संशयित असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!