नाना, फेटा बांधायचा राहून गेला !

दुष्काळ ग्रस्त 35 गावाचा पाणी प्रश्न अपूर्ण हीच एक खंत


मंगळवेढा : दत्ता कांबळे
गेली 15 वर्षे पंढरपूर-मंगळवेढा जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेला लोकनेता आमदार भारत नाना भालके यांनी राजकीय पटलावर अनेकांना अस्मान दाखवून जनतेच्या प्रेमावर गेली 11 वर्षे अधिराज्य केले. परंतु या लोकनेता मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांसाठी पाणी मिळावे म्हणून अहोरात्र प्रयत्न करत होता. पण अचानक या लोकनेत्यावर काळाने झडप घातली आणि हा जनतेचा लोकनायक काळाच्या पडद्याआड झाला.

मंगळवेढा अंत्ययात्रा ( vdo )

दुष्काळी भागात पाणी आल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा आम.भारत नानांनी पहिल्या निवडणुकीत पण केला होता. त्यानंतर 3 निवडणुका जिंकल्या, मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर करून घेतली, टोकन निधी ही मिळवला, तरीही भारत नानांनी फेटा बांधला नाही. दुष्काळी शिवारात पाणी आल्याशिवाय फेटा न बांधण्याचा पण अपूर्ण राहिला आणि फेटा बांधायचा ही राहून गेला.


आमदार भारत नाना भालके यांनी या दुष्काळी भागातील शेतकरी हा कायम दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असून या भागातील हक्काचे पाणी हे इतरत्र वापर करुन सरकार या भागातील शेतकरी वर्ग यांच्यावर अन्याय करत असल्याचे नानांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले असल्याचे आपण विधानसभेत अनेकदा पाहिले आहे.

आमदार भारत नाना भालके यांनी या दुष्काळी भागातली शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून अजूनपर्यंत आपल्या डोक्यावर फेटा बांधला नाही.जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांच्या बांधात पाणी बघत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही ही त्यांची इच्छा होती परंतु ती इच्छा अपूर्ण राहिली असल्याची खंत नाना सह या भागातील शेतकरी आणि जनता यांची अपूर्ण राहिल्याने ही कधीही भरून न निघणारी खंत आहे.

35 गावातील जनतेचा आधार गेला…
या भागातील जनतेचे नानावर जीवापाड प्रेम होते नानाच्या अचानक जाण्याने या भागातील जनतेचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. नानांनी सुद्धा या भागातील जनतेच्या विश्वासला तडा जाऊ दिला नाही ते कायम जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहिले.
दत्ता (आबा) कांबळे
माजी सभापती, मंगळवेढा


2009 च्या विधानसभा निवडणुकीत नाना सोबत मोजकेच हिरे सोबत होते. विजयदादा सारखा बलाढ्य उमेदवार त्यांच्यासमोर असताना आमदार भारत नानांनी जनतेच्या आशीर्वादाने विजयंदादाना हरवूूून आश्चर्यचा धक्का देेेत ते जायंट किल्लर ठरले. परत 2014 मध्ये त्यांनी मोदी लाट असताना सुद्धा प्रशांत परिचारक यांना पाणी पाजून राजकीय जाणकारांना दुसरा धक्का दिला.


सर्वांत महत्त्वाची निवडणूक ठरलेली 2019 ची निवडणूक या मध्ये नानांनी सर्व बाजुंनी पछाडलेले असताना सुद्धा त्यांनी शरद चंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली आणि मायबाप जनतेनी नानाची झोळी खाली आहे हे समजल्यावर त्यांना भरभरून दान देऊन आपली सेवा करण्यासाठी पुन्हा विधानसभेत हा पट्ट्या पाठवला. 35 गावाला पाणी मिळावे म्हणून नानांनी जीवापाड प्रयत्न केला परंतु त्यांचा हा प्रश्न अधुरा राहिल्याने ही एक त्यांची खंत अपूर्णच राहिली.नाना आपणं केलेले प्रयत्न या भागातील जनता कधीच विसरणार नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!