भगीरथदादां च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू

पंढरपूर शहरातील कार्यकर्त्यांचा निर्धार : 12 डिसेंबर रोजी सरकोलीला शेकडो कार्यकर्ते जाणार

प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना धनंजय कोताळकर

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आमदार भारत नाना भालके यांचे अकाली निधन झाल्याने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका पोरका झाल्याचे दिसत असले तरी युवा नेते भगीरथ दादा भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि भारत नानांची अपुरी स्वप्ने पूर्ण करू. विठ्ठल परिवार एकसंधपणे उभा करू असा निर्धार आज भारत भालके यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी झालेल्या शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच भगीरथ भालके यांना भेटण्यासाठी 12 डिसेंम्बर रोजी शहरातील शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आले.

यावेळी दिलीप देवकुळे, धनंजय कोताळकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले, किरणराज घाडगे, संदीप मांडवे, सागर यादव, राजाभाऊ उराडे, महादेव धोत्रे, महंमद उस्ताद, राजू भोसले, संजय बंदपट्टे, अनिल अभंगराव, शेळके गुरुजी, शंकर सुरवसे, प्रशांत ( मुन्ना ) मलपे, शिवाजीअप्पा मस्के, दत्तात्रय शिंदे, सुमित शिंदे, सोहम घाडगे, चंद्रकांत पवार, राजाभाऊ पवार, दिलीप कोरके, प्रमोद भोसले, विशाल आर्वे, सुहास म्हमाणे, फलटणकर, विक्रम कोताळकर, शिरीष थोरात, शुभम मलपे, जय देशमाने, अनंत नाईकनवरे आदींसह मोठ्या संख्येने आजी माजी नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आ.भारत नाना भालके यांनी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना आधार दिला, ताकद दिली. आज त्यांच्या निधनानंतर आपण कार्यकर्त्यांनी प्रत्येकजण भारत नाना आहोत असे समजून कामाला लागूया, विठ्ठल परिवार, पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघ पोरका राहणार नाही यासाठी आपली ताकद भगीरथ दादांच्या पाठीशी उभा करूया असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करूयात, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम जोमाने सुरू झाला असून संचालक मंडळ एकमुखाने पुढील चेअरमन निवडीबाबत निर्णय घेईल अशीही अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

भगीरथ भालके हे सुशिक्षित, समंजस, सर्वांशी मान, सन्मानाने वागणारे युवा नेते आहेत. आमदार पुत्र असल्याचा बडेजाव त्यांनी कधीही मिरवला नाही, नानांसारखे तेसुद्धा जमिनीवर चालनारे व्यक्तिमत्त्व असून बाप से बेटा सवाई असल्याचे ते सिद्ध करून दाखवतील असे यावेळी काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.

येत्या 12 डिसेंबर रोजी खा शरद पवार यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा उभारी घेण्यासाठी पवार साहेबांकडून प्रेरणा घेऊ म्हणून शहरातील सर्व कर्तकर्ते 12 डिसेंबर रोजी पंढरपूर येथील संपर्क कार्यालयातून सरकोली येथे जाऊन भगीरथ भालके यांना आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत हे दाखवून देण्याचे निश्चित करण्यात आले.

Leave a Reply

error: Content is protected !!