टाटा मेमोरियल रुग्णालयाला १२० कोटींची जमीन दान

मुंबईतील मराठी महिलेचे दातृत्व

टीम : ईगल आय मीडिया

मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाला मुंबईतील मराठी महिलेने तब्बल १२० कोटी रुपयांची जमीन दान केली आहे.
केमो सेंटर सुरु करण्यासाठी या महिलेने रुग्णालयाला ही जागा दान केली असून टाटा रुग्णालयापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असलेली ही जमीन रुग्णालयासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे याचसोबत इतर १८ देणगीदारांकडून देखील टाटा रुग्णालयाच्या केमो सेंटरच्या बांधकामासाठी १८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

टाटा मेमोरियल रुग्णालय हे कर्करोग असलेल्या रुग्णांवर उपचार करणारं देशातील सर्वात मोठं रुग्णालय आहे.
त्यामुळे, देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इथे येत असतात. रुग्णांच्या मोठ्या संख्येने निश्चितच रुग्णालयातील यंत्रणेवर मोठा ताण असतो. त्यापैकी नव्या केमोथेरपी सेंटरचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता मार्गी लागणार आहे.


मुंबईच्या ६१ वर्षीय दीपिका मुंडले यांनी आपली वडिलोपार्जित अंदाजे १२० कोटी रुपये किंमतीची असलेली ३० हजार चौरस फुटाची जागा टाटा रुग्णालयाला देणगी म्हणून दिली आहे. १९ मुंबईकरांनी केलं दान अन्य १८ देणगीदारांसह आता टाटा रुग्णलयासाठी एकूण १९ मुंबईकरांनी दान केलं आहे.

सध्या या रुग्णालयात केमोथेरपीसाठी १०० बेड उपलब्ध आहेत.
मात्र, इथे दररोज तब्बल ५०० रुग्णांना केमोथेरपी दिली जाते. मुळातच रुग्णांची संख्या जास्त असल्याने सद्यस्थितीत रुग्णांना केमोथेरपीसाठी ३० दिवस वाट पहावी लागत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!