अटक का करू नये ?

अर्णव गोस्वामी को ‘ पुछता है मुंबई पुलीस ‘

टीम : ईगल आय मीडिया

पुछता है भारत या कार्यक्रमात समाजात तेढ वाढवणाऱ्या वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल का करू नये आणि अटक का करू नये ? अशी विचारणा करणारी नोटीस मुंबई पोलिसांनी रिपब्लिकन टीव्ही चे संपादक अर्णव गोस्वामी यांना केली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी चाप्टर प्रक्रिया सुरू केली असून अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘पूछता है भारत’ शो मध्ये समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये? अशी विचारणा केली आहे. आता यावर अर्णव गोस्वामी काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.


पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीवर अर्णब गोस्वामी यांना प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असे लेखी बंधपत्र द्यावे लागणार आहे. तसेच १० हजार रुपये जामिनासाठी भरावे लागणार आहेत. जामिनदार अर्णब यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणारे हवेत, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!